मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील गोराईया गावात पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे पुजाऱ्याला गावातील शिव मंदिरात पूजा करण्यास नकार देणे महाग पडलं आहे. मात्र, मारहाणीतून त्याने कसा तरी जीव वाचविला आणि पळ काढला. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी केली आणि ग्रामस्थांनाही दुखापत झाली. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी सायंकाळी सहा लोकांनी पुजाऱ्याशी भांडण सुरू केले. जेव्हा पुजारी दिनेश मिश्रा मंदिराच्या बाहेर उभे होते. संतप्त सिंह बारगाही आणि त्याच्या पुतण्यांनी सकाळी मंदिरात पूजा करू न दिल्याने पुजाऱ्यावर लाठ्या - काठ्यांने बेदम मारहाण केली. एका युवकाने पुजाऱ्याला दूर खेचत नेले. दरम्यान, बचावासाठी आलेल्या गावातील मुन्ना लाल काचेर यांच्या डोक्याला देखील दुखापत झाली. पुजाऱ्याने कसाबसा बचाव करून पळ काढून आपला जीव वाचवला आणि कोटार पोलीस ठाण्यात याची नोंद केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला.पोलिसांनी गुन्हा दाखल केलाअतिरिक्त एसपी गौतम सोलंकी यांनी सांगितले की, ही घटना कोटारच्या गोराईया गावची आहे. येथील शिव मंदिरात पुजाऱ्याला मारहाण करण्यात आली. मंदिरात पाणी अर्पण केल्याबद्दल वाद झाला आणि यावेळी दोन्ही बाजूंनी मारहाण केली. पुजाऱ्याने गुन्हा दाखल केला असून मारहाणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
लॉकडाऊनमध्ये औषध आणायला गेला तो जिवंत परतलाच नाही, पोलिसांना घाबरला अन्
पालघरनंतर आता युपीतील बुलंदशहरात दोन साधुंची हत्या, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप