पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संकटात परदेशी महिला, तरुणीकडून देहविक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 01:57 PM2020-07-18T13:57:15+5:302020-07-18T13:59:37+5:30
पिंपरी -चिंचवड शहरात भाडे तत्वावरील घरात वास्तव्यास असणाऱ्या महिला व्हाट्स अँप क्रमांकावरून ग्राहकांशी संपर्क साधून देहविक्रय करीत
पिंपरी : कोरोना रुग्णांच्या संख्येने पिंपरी-चिंचवड शहरात १० हजारांचा टप्पा पार केला असतानाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशी महिला आणि तरुणी देहविक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. व्हॉटसअॅपचा त्यासाठी त्यांच्याकडून वापर सुरू होता.
याप्रकरणी ४० वर्षीय महिला व २५ वर्षीय तरुणीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळच्या युगांडा येथील असून, सध्या त्या दोघी पिंपरी-चिंचवड शहरात भाडे तत्वावरील घरात वास्तव्यास होत्या. व्हॉटसअॅप क्रमांकावरून ग्राहकांशी संपर्क साधून दोघी आरोपी देहविक्रय करीत होत्या. याबाबत माहिती मिळताच वाकड पोलिसांनी आरोपी यांना ताब्यात घेतले. भारतात राहण्यासाठी लागणाºया व्हिजाची मुदत संपली असताना बेकायदेशीररित्या राहात असल्याचे देखील पोलीस तपास समोर आले आहे.
शहरात कोरोनाच्या विषाणूंचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाही आरोपी यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, उपजीविका भागविण्यासाठी त्या देहविक्री करत असल्याचे आरोपी यांनी पोलिसांना सांगितले.