राज कुंद्रा पोर्न केस: अवघ्या १०० दिवसांत करोडपती झाली ती महिला, समोर आली धक्कादायक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 09:58 AM2021-07-27T09:58:14+5:302021-07-27T10:05:02+5:30

Raj Kundra porn case: पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या चौकशीमध्ये एका पाठोपाठ एक धक्कादायक गौप्यस्फोट होत आहे.

Raj Kundra porn case: The woman who became a millionaire in just 100 days, shocking information came to light | राज कुंद्रा पोर्न केस: अवघ्या १०० दिवसांत करोडपती झाली ती महिला, समोर आली धक्कादायक माहिती 

राज कुंद्रा पोर्न केस: अवघ्या १०० दिवसांत करोडपती झाली ती महिला, समोर आली धक्कादायक माहिती 

googlenewsNext

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या चौकशीमध्ये एका पाठोपाठ एक धक्कादायक गौप्यस्फोट होत आहे. (Raj Kundra porn case) दरम्यान या प्रकरणाच्या तपासामधून राज कुंद्रा याची कंपनी फ्लिज मुव्हीजच्या उत्पन्नातील काही भाग हा कानपूरमधील रहिवासी असलेल्या अरविंद श्रीवास्तव याची पत्नी हर्षिता हिच्या खात्यामध्ये थेट ट्रान्सफर होत असल्याचे उघड झाले आहे. तसेच या खात्यांमधील सविस्तर माहिती तपासली असता केवळ १०० दिवसांमध्ये हर्षिता करोडपती झाल्याचे उघड झाले आहे. (The woman who became a millionaire in just 100 days, shocking information came to light)

राज कुंद्रा पोर्न केसमध्ये नवनवी माहिती समोर येत असताना आता या प्रकरणातील कानपूर कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या अरविंद श्रीवास्तव याला हा अश्लील व्यवसाय खूप फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे. अरविंद याची पत्नी हर्षिता ही १०० दिवांमध्येच करोडपती झाल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्यांदा चॅनल फ्लिज ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड करून अऱविंदची पत्नी हर्षिता हिच्या खात्यात ४० हजार रुपये ट्रान्सफर केले गेले. त्यानंतर १०० दिवसांमध्ये अरविंदने पत्नीच्या खात्यामध्ये २ कोटी १५ लाख रुपये ट्रान्सफर केले. हे पैसे पगाराच्या रूपात जमा करण्यात आले. मात्र कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार हर्षिता ही नोकरी करत नाही.

पंजाब नॅशनल बँकेच्या बर्रा ब्रँचमध्ये हर्षिताचे खाते आहे. १९ वर्षे जुन्या ह्या खात्याच्या पडताळणीमधून पोर्न चित्रपटांच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईचा अंदाज येऊ शकतो. प्लिज ओपीसी प्रायव्हेट लिमिटेडने  १० मे २०१९ रोजी हर्षिता हिच्या खात्यामध्ये ४० हजार रुपये ट्रान्सफर केले होते. १९ सप्टेंबरपर्यंत फ्लिज मुव्हिजने २३ वेळा मिळून ३६.६० रुपये पाठवले. १ जून २०२० रोजी अरविंदने पत्नीच्या पगाराच्या नावावर ४.८० लाख रुपये जमा केले. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी अरविंदने ५१०० रुपये टेस्टिंग अमाऊंट म्हणून खात्यात पाठवले. अरविंदने २३ वेळा मिळून २ कोटी रुपये हर्षिताच्या खात्यात जमा केले. यामधील सर्वात लहान रक्कम ५ लाख आणि सर्वात मोठी रक्कम २० लाख रुपये होती.  

Read in English

Web Title: Raj Kundra porn case: The woman who became a millionaire in just 100 days, shocking information came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.