दलित मुलीच्या वरातीवर दगडफेक; MP सरकारने हल्लेखोरांच्या घरावर चालवला बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:19 PM2022-05-20T14:19:07+5:302022-05-20T14:20:02+5:30
Pelted stones on dalit daughter barat : संतप्त झालेल्या वऱ्हाडींनी झिरापूर पोलीस स्टेशनमध्ये हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
राजगड : मध्य प्रदेशातील राजगडमध्ये गुरुवारी एका दलित मुलीच्या लग्नाच्या वरातीवर दगडफेक करणाऱ्या बदमाशांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर फिरवला. ही घटना जिरापूरमध्ये मंगळवारी रात्री घडली. वरात मशिदीसमोरून बँडबाजा वाजवत जात असताना जवळपास २५ हल्लेखोरांनी दगडफेक केली होती. या दगडफेकीत चार लग्न वराती आणि एक मुलगी जखमी झाली. यानंतर संतप्त झालेल्या वऱ्हाडींनी झिरापूर पोलीस स्टेशनमध्ये हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
जिरापूरच्या माताजी वस्तीत राहणारे मदन मालवीय यांची मुलगी अंजूच्या लग्नाची वरात सुसनेरहून आली होती. रात्री अकराच्या सुमारास मशिदीसमोरून वरात बँड-बाजासह निघत होती. दरम्यान, तेथे उभ्या असलेल्या काही समाजकंटकांनी बँड बाजावाल्यांना बँड वाजवणे बंद करण्यास सांगितले. यानंतर बँडवाल्याने मशिदीसमोर बँड बंद केला. यानंतर वराती शीतला माता मंदिराच्या मागील बाजूस पोहोचले आणि त्यांनी पुन्हा बँडबाजा सुरू केला.
अशी घटना
बँडबाजा सुरू होताच मागून काही समाजकंटक आले आणि शिवीगाळ करत विटा, दगड फेकण्यास सुरुवात केली. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच जिरापूर मचलपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिरापूर मचलपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रभात गौर यांनी जखमींना रुग्णालयात नेले व दगडफेक करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणले. मिळालेल्या माहितीनुसार, या दगडफेकीत एक तरुण अधिक जखमी झाला आहे. त्याला राजगड येथे रेफर करण्यात आले आहे. येथे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अशी माहिती पोलिसांनी दिली
ही वरात सुसनेरहून येत होती, अशी माहिती पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रभात गौर यांनी दिली. या वरातीसंदर्भात मुलीचे वडील सुरेश चौहान जिरापूरला पोहोचले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अल्पसंख्याक समाजातील सुमारे २५ लोकांनी बँड वाल्यांसह वरतीत मारहाण केली. या हल्ल्यात काही वराती जखमी झाले.