खळबळजनक! पोलीस बंदोबस्त असूनही कॉलेज कॅम्पसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

By पूनम अपराज | Published: October 13, 2020 07:13 PM2020-10-13T19:13:57+5:302020-10-13T19:14:49+5:30

Rape in Uttar Pradesh : पीसीएसची प्राथमिक परीक्षा २०२० चालू असताना विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये रविवारी १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

Rape of a minor girl on college campus despite police bandobast | खळबळजनक! पोलीस बंदोबस्त असूनही कॉलेज कॅम्पसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

खळबळजनक! पोलीस बंदोबस्त असूनही कॉलेज कॅम्पसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

googlenewsNext
ठळक मुद्देदहावीच्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने तिला जबरदस्तीने कॅम्पसमधील होस्टेलच्या रूममध्ये खेचत नेले होते.

उत्तर प्रदेश येथे हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संपूर्ण देशात पडसाद उमटत असताना पुन्हा झाशीमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत दहावीच्या विद्यार्थिनीवर कॉलेज कॅम्पसमध्ये बलात्कार करण्यात आला. घटना घडली त्यावेळी कॉलेजमध्ये पोलीस बंदोबस्तात पीसीएसची ( प्रांतीय नागरी सेवा) परीक्षा सुरू होती. पीसीएसची प्राथमिक परीक्षा २०२० चालू असताना विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये रविवारी १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशमधील झांसी महाविद्यालयातपोलिस उपस्थिती असूनही, पीसीएसची परीक्षा चालू असताना विद्यार्थ्याने तरुणीला लुटले आणि चित्रीकरण देखील केले, अशी माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. दहावीच्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने तिला जबरदस्तीने कॅम्पसमधील होस्टेलच्या रूममध्ये खेचत नेले होते. तिने पोलिसांना सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तिच्याकडून दोन हजार रुपये लुटले आणि त्यातील एकाने तिचा लैंगिक छळ केला तर इतरांनी त्याचे चित्रीकरण केले.

या घटनेबद्दल कोणाशीही काही बोलल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तिला इंटरनेटवरून व्हिडिओ लीक करण्याची धमकीही दिली, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. दरम्यान, कॅम्पसमध्ये अपीडित मुलीच्या उपस्थिती पोलिसांकडून तपासणी केली गेली. गेटसमोर असलेल्या एका मित्राला भेटत असताना तिला विद्यार्थ्याने जबरदस्तीने कॅम्पसमध्ये नेले होते, असे पोलिसांना सांगितले. तिने पोलिसांना सांगितले की, गेटवर सुरक्षारक्षक नव्हता. या घटनेसंदर्भात आठ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती झाशी एसएसपी दिनेश कुमार पी यांनी दिली. पुढील तपास सुरू असल्याचे एसएसपीने सांगितले.

“काही पोलिस कर्मचार्‍यांनी मुलीचे ओरडणे ऐकून तिला सिप्री बाजार पोलिस ठाण्यात नेले आणि तेथे तिने पोलिसांना हकीकत सांगितली. तिने एका आरोपीची भरत म्हणून ओळख पटवली असल्याची माहिती एसएसपीने दिली आहे. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६डी,३९५, ३८६, ३२३,१२० बी (गुन्हेगारी कट रच) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ड आणि पॉक्सो कलम ३ आणि ४  अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. या गुन्ह्यानुसार रोहित सैनी, भारत कुशवाह, शैलेंद्र नाथ पाठक, मयंक शिवहरे, विपिन तिवारी, मोनू पर्या, धर्मेंद्र सेन आणि संजय कुशवाह हे अटक केलेल्यांची आरोपींची नावे आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी होते. या घटनेत सामील झालेल्या इतर विद्यार्थ्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी संस्था पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे प्राचार्य यांनी सांगितले. 
 

Web Title: Rape of a minor girl on college campus despite police bandobast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.