Rape in Rajasthan : खळबळजनक! उत्तर प्रदेशानंतर आता राजस्थानात महिलेवर बलात्कार, एकाला अटक
By पूनम अपराज | Published: October 1, 2020 08:06 PM2020-10-01T20:06:39+5:302020-10-01T20:07:09+5:30
Rape in Rajasthan : सोशल मीडियावर या घटनेला सामूहिक बलात्कार असल्याचा म्हटले जात आहे, परंतु पोलिसांनी सामूहिक बलात्कार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राजस्थानच्या बारांमध्ये दोन बहिणींसोबत बलात्काराचे प्रकरण ताजे असताना अजमेरमध्ये एका महिलेवर बलात्काराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर या घटनेला सामूहिक बलात्कार असल्याचा म्हटले जात आहे, परंतु पोलिसांनी सामूहिक बलात्कार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही घटना अजमेरची आहे. जेथे एका महिलेवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्वरित गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर उशीर न करता कारवाई करण्यास सुरवात केली. महिलेचे मेडिकलही केले गेले. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी आरोपींपैकी एक पोलिसांच्या तावडीत सापडला.
गुरुवारी अजमेर पोलिसांनी महिलेचा जबाब कलम१६१ अन्वये नोंद केला गेला आहे . पोलिसांनी अटक आरोपी युवकाचीही चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेमागे जुन्या प्रेमसंबंधाचे कारण असू शकते. या घटनेचा सोशल मीडियावर गॅंगरेप म्हणून प्रचार केला जात आहे. मात्र, पोलिसांनी सामूहिक बलात्कार नसल्याचे सांगितले आहे. या महिलेवर सामूहिक बलात्कार नसल्याचा दावा अजमेर पोलिसांनी केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासाचे काम अजमेर (दक्षिण सर्कल) चे सीओ मुकेश कुमार यांना देण्यात आले आहे.
Hathras Case: "त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही, मार लागल्याने झाला मृत्यू" - एडीजी प्रशांत कुमार#HathrasCase#UPPolicehttps://t.co/sB7O09tGUx
— Lokmat (@MiLOKMAT) October 1, 2020
बारां बलात्कार प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू आहे
राजस्थानच्या बारां बलात्कार प्रकरणात पीडितांचे जबाब पुन्हा दंडाधिकाऱ्यांसमोर मांडली जातील. मुलींनी पोलिसांना सांगितले आहे की, त्यांना पुन्हा आपले जबाब बदलासाठी पुन्हा द्यायचे आहेत. मुलींच्या जबाबनुसार पोलिस या प्रकरणात कलम 376 कलम लावतील. त्यांचे पुन्हा एकदा जबाब नोंदवण्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली जाईल. बुधवारी बारांमधील दोन बहिणींनी त्यांच्यावर दोन मुलांनी बलात्कार केल्याचा आरोप केला. या बाबत भाजपने निदर्शने केली. परंतु मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट केले की, हे प्रकरण चुकीचे आहे.