शिक्षक म्हणावा की नराधम! ९ वीच्या विद्यार्थिनीवर अनेकदा केला बलात्कार अन् व्हिडीओ बनवून केले ब्लॅकमेल
By पूनम अपराज | Published: December 19, 2020 02:21 PM2020-12-19T14:21:10+5:302020-12-19T14:21:45+5:30
Rape : पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
राजस्थानच्या बूंदी येथे एका खेड्यातील शिक्षकावरबलात्काराचा आरोप आहे. पीडित मुलीचे म्हणणे आहे की, शिक्षकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत राहिला. कुटुंबियांनी दबलाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
असे सांगितले जात आहे की, पीडित मुलगी ९ वी इयत्तेमध्ये शिकते आणि शिक्षक तिसरीच्या वर्गाला शिकवतो. तो त्या पीडित मुलीला धमकी देऊन घाबरवायचा. त्यामुळे नाईलाजास्तव तिला त्या नराधम शिक्षकाकडे जावे लागत असे. आरोपी शिक्षक धर्मराजा मीणा याने तीन ते चार वेळा मुलीसोबत बलात्काराची घटना घडवून आणली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास हिंडोली सीआय मुकेश मीणा यांच्याकडे देण्यात आला. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला
शालेय शिक्षकाच्या या दुष्कृत्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागाला काळिमा फासले गेले आहे. तपास अधिकारी हिंडोलीचे पोलीस अधिकारी मुकेश मीणा म्हणाले की, पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती, त्यात पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी कधी सीडी तर कधी पुस्तकाच्या बहाण्याने मुलीला शाळेत बोलावत असे, कधी कधी तिच्यावर बलात्कार करत असे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी शिक्षकाने मुलीला दुसर्या गावी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. आरोपी शिक्षक धर्मराजा मीणा याचा शोधही सुरू आहे.