रेखा जरे  हत्याकांड: प्रेम प्रकरणातून वाद; बदनामीच्या भीतीने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:18 AM2021-06-09T10:18:35+5:302021-06-09T10:20:17+5:30

Rekha Jare murder: पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात हत्येचे हेच मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Rekha Jare murder: Argument over love affair; Murder for fear of defamation | रेखा जरे  हत्याकांड: प्रेम प्रकरणातून वाद; बदनामीच्या भीतीने हत्या

रेखा जरे  हत्याकांड: प्रेम प्रकरणातून वाद; बदनामीच्या भीतीने हत्या

googlenewsNext

अहमदनगर : प्रेमप्रकरणातून वारंवार झालेले वाद आणि यातून होणाऱ्या बदनामीच्या भीतीतूनच बाळ बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या केल्याचे अखेर पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात हत्येचे हेच मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयात मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह जनार्दन चंद्रप्पा, राजशेखर चाकली, पी. अनंतलक्ष्मी, व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व  रा. हैदराबाद) व महेश तनपुरे (रा. अहमदनगर) यांच्या विरोधात ४५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. बोठे याच्याविरोधात कट रचून हत्या करणे तर उर्वरित सहा जणांविरोधात फरार आरोपीला मदत करणे असा दोष ठेवण्यात आला आहे. 

बोठे याने ३० नोव्हेंबर २०२० रोजी सुपारी देऊन जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट येथे हत्या घडवून आणली होती. 

बोठे याने असा रचला कट
बोठे याने सागर भिंगारदिवे याला हाताशी धरून जरे यांच्या हत्येचा कट रचला. २४ नोव्हेंबरला करंजी घाटात जरे यांच्या कारचा अपघात घडवून घातपात करण्याचे ठरले, मात्र आरोपींचा हा डाव फसला. त्यानंतर ३० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. 
बोठे याने या कामासाठी सागर उत्तम भिंगारदिवे याला सुपारी दिली. भिंगारदिवे याने हे काम आदित्य चोळके याला दिले होते.

Web Title: Rekha Jare murder: Argument over love affair; Murder for fear of defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.