गॅस कटरने एटीएम फोडून २३ लाख लंपास; CCTV कॅमेरेही रासायनिक स्प्रे मारून केले निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 11:12 AM2022-06-09T11:12:01+5:302022-06-09T11:19:13+5:30
याबाबत कामाती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.
सोलापूर- सोलापूमधील मोहोळ तालुक्यातील कुरुलमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या एटीएम मशीनचा दरवाजा गैस कटरने उचकटून आतील तब्बल २२ लाख ९९ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. काळ्या रंगाचे जर्किन घातलेल्या आणि चेहरा झाकलेल्या अज्ञात चोरट्याने त्याच्या साथीदारांसह ही धाडसी चोरी केली.
विशेष म्हणजे या चोराने एटीएम फोडण्यापूर्वी एक विशिष्ट रासायनिक स्प्रे वापरून सिसिटीव्ही कॅमेरे निकामी केले आहेत. याबाबत कामाती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.