मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू (mansukh hiren death Case) प्रकरणामुळे रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एनआयएच्या (NIA) पथकाने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा गाडी आपणच चालवत होतो, अशी कबुली याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी दिली आहे. (sachin vaze confessed to nia; said, i was driving that innova )
गेल्या महिन्यात 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा गाडी आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझे हेच चालवत होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, स्कॉर्पिओ आणि पांढरी गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस होते.
अखेर या प्रकरणी एनआयएच्या पथकाने चौकशी केली असता सचिन वाझे यांनी आपणच ती गाडी चालवत होतो, अशी कबुली दिली आहे. याचबरोबर, स्कॉर्पिओ गाडी उभी करून पांढऱ्या गाडीतून सचिन वाझे आणि आणखी दोन CIU चे अधिकारी बसून मुलूंड टोल नाक्यावरुन ठाण्याला गेले होते. पांढऱ्या रंगाची इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडी ठाणे येथेच पार्क केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त न्यूज-१८ लोकमतने दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असलेली स्कॉर्पियो आणि इनोव्हा गोडी जप्त केल्यानंतर एनआयएने मंगळवारी एक मर्सिडीज बेन्झ (Mercedes Benz) गाडीही जप्त केली आहे. सचिन वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली. गाडीच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते.
("मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नवं वळण, 'त्या' मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचा फोटो!")
मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचा फोटो, काँग्रेस नेत्याचा दावाया प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप (BJP Leader) नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) यांनी केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली, त्या दिवशी याच गाडीतून त्यांनी प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.
(सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज जप्त पाच लाखांची रोकड हस्तगत)
जानेवारीत केली मर्सिडीजची ऑनलाइन विक्रीमर्सिडीजचे मूळ मालक धुळ्यातील सारांश भावसार आहेत. जानेवारीत त्यांनी गाडीची ऑनलाइन विक्री केली होती. ‘कार २४’ या वेबसाईटवरून त्याचा व्यवहार केला होता. त्यामुळे कार विकत घेणाऱ्या दुसऱ्या पार्टीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. तपास यंत्रणेने आपल्याशी संपर्क साधलेला नाही, त्यांनी विचारणा केल्यानंतर आपण सर्व माहिती देऊ, असे भावसारने एका वृत्तवहिनीला सांगितले.