Sachin Vaze : सचिन वाझेंच्या कटात माझा सहभाग नाही; उत्तर प्रदेशच्या गॅंगस्टरने फेटाळले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 04:10 PM2021-04-04T16:10:04+5:302021-04-04T16:11:01+5:30
Sachin Vaze : बनारस हिंदू युनिव्हर्सिटी रुग्णालयामध्ये सुभाषसिंग ठाकूर दाखल असताना वाझे आणि ठाकूर या दोघांची मध्यस्थाने भेट घडवल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर प्रदेशातील गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर जिलेटिन ठेवण्याच्या प्रकरणात तसेच सचिन वाझे यांच्या कोणत्याही कटामध्ये सहभागी नसल्याचा दावा केला आहे. सुभाषसिंग ठाकूरची टोळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई विरारमध्येही सक्रिय असल्याचं म्हटलं जातं आहे. काही काळापूर्वीच वसुलीसाठी मालाडमध्ये एका व्यापाऱ्यावर त्याच्या टोळीने गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी सुभाषसिंग ठाकूर याच्या माध्यमातून कट रचल्याचा दावा केला जात होता. टेलिग्रामवर वाझेंनी ठाकूरला मेसेज पाठवल्याची चर्चा आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी रुग्णालयामध्ये सुभाषसिंग ठाकूर दाखल असताना वाझे आणि ठाकूर या दोघांची मध्यस्थाने भेट घडवल्याची माहिती मिळत आहे.
Sachin Vaze: 'तो' NIAने स्वतः निर्माण केलेला एक बनाव; आता वाझेंनीच कोर्टात केला खळबळजनक आरोप
Sachin Vaze: अटकेनंतर सचिन वाझेच्या खात्यातून 26.50 लाख रुपये कोणी काढले? NIA समोर गूढ वाढले
गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याने वाराणसीतील आपले वकील जालंदर राय यांच्यामार्फत मुंबईतील वकील के. एम. त्रिपाठी यांच्याद्वारे परिपत्रक जारी केले. अँटिलिया स्फोटक प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हात असल्याचा किंवा टेलिग्राम मेसेज न पाठवल्याचा दावा केला आहे. यूएईवरुन धमकीचे पत्र पाठवायचं होतं, परंतु नंतर हे काम तिहार जेलमध्ये कैद तहसीनच्या माध्यमातून हे काम केलं गेलं. आता गँगस्टर सुभाषसिंग ठाकूरचे उत्तर प्रदेशातील वकील जालंदर राय यांनी ठाकूर आणि वाझे यांची कुठलीही भेट झाल्याबाबत स्पष्ट नकार दिला आहे. यूएईमधील कोणालाही तो ओळखत नाही किंवा तहसीनशीही ओळख नसल्याचं राय यांनी स्पष्ट केले आहे. जैश-उल-हिंदच्या टेलिग्राम मेसेजशी ठाकूरचा संबंध असल्याचा दावा ठाकूरच्या वकिलाने फेटाळला आहे. हे सर्व दावे केवळ खळबळजनक वळण प्रकरणाला देण्यासाठी केले जात असल्याचंही राय यांनी म्हटलं आहे.