एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या मेहुणीने दाखल केलेल्या तक्रारीमुळे नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्विट करत मलिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवाब मलिक यांनी सोमवारी (८ नोव्हेंबर) एक ट्विट करत समीर वानखेडेंना प्रश्न विचारला होता. या ट्वीटमध्ये मलिकांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीचा उल्लेख केला होता. याच ट्विटवरून आता वानखेडे यांच्या मेहुणीने विटंबना केल्याचा आरोप करत मलिकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मेहुणी तसेच अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र आता क्रांती रेडकर यांच्या बहिणीच्या वकिलाने गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर हिची बहीण आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं.नंतर आता समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नवाब मलिक आणि निशांत वर्मा यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४-ड, ५०३ यासह स्त्रियांचं अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा-१९८६ च्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते नवाब मलिक? नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा रेडकर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.
यासंदर्भात नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी विचारले की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवश्य द्यावं लागेल, कारण या प्रकरणातील खटला पुण्यातील कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तसेच खालील कागदपत्रे त्याचा पुरावा आहे.