मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचा दत्तक पुत्र सुंदर शेखर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत बरोबर असल्याचे सांगितले. इंदिरा गांधींनी करीम लालाला भेटायला यायच्या. इतर बरेच नेतेही करीम चालला भेटायला यायचे. हाजी मस्तान एक व्यापारी होते. बाळासाहेब ठाकरे हेही हाजी मस्तान यांचे चांगले मित्र होते असल्याची पडद्यामागील माहिती सुंदर शेखर यांनी दिली आहे.तसेच संजय राऊत यांच्या इंदिरा गांधी याविषयीच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापल्यानंतर शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी आपले विधान मागे घेतले. राऊत म्हणतात की, आमच्या काँग्रेसच्या मित्रांना दु:खी होण्याची गरज नाही.
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबाबत केलेले विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी अखेर मागे घेतले आहे. मी केलेल्या वक्यव्यामुळे कुणी दुखावले असेल तर हे विधान मी मागे घेत आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा होता. त्यावेळी मोठमोठ्या नियुक्त्यासुद्धा या अंडरवर्ल्डच्या सल्ल्याने होत. त्याकाळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
'इंदिरा गांधींनीच करीम लाला अन् हाजी मस्तानला तुरुंगात डांबले'काल पुण्यात झालेल्या लोकमत पत्रकारिता पुस्कारांच्या वितरण सोहळ्यात संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. एकेकाळी मुंबईवर आणि येथील राजकारणात असलेल्या अंडरवर्ल्डच्या दबदब्याबाबत राऊत म्हणाले होते की, ''त्याकाळी छोटा शकील, दाऊद हेच ठरवायचे पोलीस कमिशनर कोण होणार, हाजी मस्तान मंत्रालयात गेल्यावर संपूर्ण मंत्रालय त्याला घ्यायला खाली यायचे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या कुख्यात गुंड करिमा लाला याला भेटायला आल्या होत्या.'' मात्र या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले होते. अखेरीस आज मी केलेल्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेस धक्का लागला आहे असे वाटत असेल तर, तसेच त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो, असे सांगत राऊत यांनी हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला.