सांगली : कुपवाड औद्योगिक वसाहतीतील आनंद इंडस्ट्रीज या कारखान्यावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने भेसळीच्या संशयावरून ८ लाख ३३ हजार रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. प्रशासनाने चना बेसन, मक्याचे पीठ, खाण्याचा सोडा, हरभरा डाळ आदी अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने सलग दुसºया दिवशी भेसळीच्या संशयावरून कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी विश्रामबाग येथील फरसाणा कारखान्यावर छापा टाकला होता, बुधवारी कुपवाड एमआयडीसीतील कंपनीवर छापा टाकला. पथकाने चना बेसनचा १०.८ टन साठा जप्त केला. त्याची किंमत ७ लाख १७ हजार ५०० रुपये इतकी आहे. तसेच ५५ हजार १२५ रुपये किमतीचे भेसळीसाठी वापरले जाणारे मक्याचे पीठ व २२५ किलो खाण्याचा सोडा, तसेच चुकीच्या पध्दतीने पॅकिंग केलेला ६१ हजार २५६ रुपये किमतीचा ९८८ किलो हरभरा डाळ तुकडा, असा एकूण ८ लाख ३३ हजार ८८१ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.शुध्द चना बेसनमध्ये मक्याचे पीठ व खाण्याचा सोडा यांची भेसळ करून उत्पादन करून पारस ब्रॅन्ड व ज्योती ब्रॅन्ड या नावाने पॅकिंग करुन विक्री करण्याचे काम चालू होते. हा माल आॅर्डरप्रमाणे तयार करुन बाहेरगावी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. तत्पूर्वीच प्रशासनाने छापा टाकून तो जप्त केला. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह. आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी फावडे, स्वामी व नमुना सहायक कवळे यांनी केली.कारखाना बंदचे आदेशअन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीवेळी कारखान्याकडील अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत परवान्याची मुदत संपल्याचे आढळून आले. कारखान्यामध्ये अस्वच्छता होती. त्यामुळे हा कारखाना बंद करण्याचे आदेश दिल्याचे चौगुले यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता
प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका
दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा
सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा
धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग