प्रांत अधिकारी कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 08:13 PM2018-10-08T20:13:51+5:302018-10-08T20:14:18+5:30
तेजमल महारु चव्हाण (वय ५५ ) असं या आरोपीचे नावं असून त्याचे मूळ पद शिरस्तेदार क्र. १ असून त्याच्याकडे नगर भूमापन कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार म्हणून वरिष्ठ लिपिक पद देण्यात आले होते.
उल्हासनगर - जमिनीच्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी 3 हजाराची लाच घेणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तेजमल महारु चव्हाण (वय ५५ ) असं या आरोपीचे नावं असून त्याचे मूळ पद शिरस्तेदार क्र. १ असून त्याच्याकडे नगर भूमापन कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार म्हणून वरिष्ठ लिपिक पद देण्यात आले होते.
तक्रारदार हे पूजा धरमवारी ट्र्स्टचे अध्यक्ष असून त्यांनी जागेची माहिती मिळण्यासाठी माहिती अधिकारात नगर भूमापन कार्यालयात अर्ज दिला होता. याबाबत माहिती देण्यासाठी आज चव्हाण पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड केल्यानंतर तीन हजार लाचेची रक्कम ठरल्यानंतर चव्हाणच्या कार्यालयीन कक्षात टेबलावर पंचासमक्ष रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली.