खळबळजनक! झोपलेल्या मुलीचे अपहरण करून केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 03:31 PM2020-02-10T15:31:36+5:302020-02-10T15:33:19+5:30
रविवारी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.
नवी दिल्ली - सध्या, निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींनी फाशी टाळण्यासाठी कायदेशीर गोष्टींचा फायदा घेत कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणीस विलंब होत असताना हरियाणामध्ये अशाच एका सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हरियाणाच्या यमुना नगरमध्ये पाच जणांनी घरात झोपलेल्या मुलीला उचलले आणि अंगणवाडीत नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक सामूहिक बलात्काराच्या घटनेत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. रविवारी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.
अत्याचाराच्या मालिका सुरूच ; अल्पवयीन युवतीचे अपहरण करून अत्याचार, गणेशनगर येथील घटना
धक्कादायक! महिला पोलिसाची हत्या करून वर्गमित्राची आत्महत्या
बोर्डिंग स्कूल सामूहिक बलात्कार; गर्भपात करणाऱ्या मुख्याध्यापकासह विद्यार्थी दोषी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा यमुना नगरमध्ये पाच मुलांनी मुलीला घरातुन पळवून मुलीला मारहाण आणि सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली. यामुळे पीडित मुलीला खूप दुखापत झाली आहे. आरोपींनी पीडितेला तिच्या घराबाहेर नेले आणि जवळच बंद अंगणवाडीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
या घटनेत एक अल्पवयीनही सामील होता. पीडित मुलगी कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटली आणि तिने घर गाठले. घडलेली घटना तिने कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी तातडीने मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी कारवाई करत पीडित मुलीला वैद्यकीय मदत पुरविली आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
सामूहिक बलात्कार, प्राणघातक हल्ल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल
घटनेची गंभीरता पाहून पोलिसांनी मुलीला वैद्यकीय उपचार तातडीने पुरविले. त्यानंतर, सामूहिक बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी मुली आणि कुटूंबाच्या निवेदनांच्या आधारे अपहरण, सामूहिक बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. मात्र, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आणखी एक कलम समाविष्ट करावा लागू शकतो.
या प्रकरणातील सर्व आरोपींची ओळखही मुलीने पटवली आहे. त्याआधारे पोलीस आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांच्या हाती आरोपी अद्याप लागले नसून लवकरच आरोपींच्या मुसक्या पोलीस आवळतील असा दावा तपास अधिकारी निर्मल सिंह यांनी केला आहे.
Haryana: A girl was allegedly abducted and gangraped by 4 people in Yamuna Nagar. Nirmal Singh, Investigation Officer, Sadhaura says, "We have lodged an FIR and have formed teams to locate the accused. Further investigation is underway". (09.02) pic.twitter.com/NW7wWde6zd
— ANI (@ANI) February 10, 2020