खळबळजनक! खिशात काडतुसे घेऊन संसदेत घुसण्याचा प्रयत्न; पकडल्यावर म्हणाला विसरलो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 07:12 PM2020-03-05T19:12:04+5:302020-03-05T19:16:12+5:30

या इसमाला पोलिसांकडे स्वाधीन केले असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

Sensational! one person entering in Parliament with live round in his pocket; When caught, he said forgot to keep outside pda | खळबळजनक! खिशात काडतुसे घेऊन संसदेत घुसण्याचा प्रयत्न; पकडल्यावर म्हणाला विसरलो

खळबळजनक! खिशात काडतुसे घेऊन संसदेत घुसण्याचा प्रयत्न; पकडल्यावर म्हणाला विसरलो

Next
ठळक मुद्देया इमासाचे नाव अख्तर खान असं आहे. सुरक्षा रक्षकांना तपासणीदरम्यान त्याच्या खिश्यात काडतुसे सापडली.

नवी दिल्ली - संसदेत घुसघोरी करणाऱ्या एका  संशयित इसमास आज दिल्लीपोलिसांनी गेट क्रमांक ८ येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्या अंगझडतीत त्याच्या खिश्यात ३ जिवंत काडतुसे सापडली. या इमासाचे नाव अख्तर खान असं आहे. सुरक्षा रक्षकांना तपासणीदरम्यान त्याच्या खिश्यात काडतुसे सापडली. याबाबत जाब विचारला असता त्याने खानने प्रवेश कारण्यापूर्वी बाहेर ठेवण्यास विसरलो असा खुलासा केला. या इसमाला पोलिसांकडे स्वाधीन केले असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. हा इसम नेमकं कोणत्या कारणाने संसदेत आला होता. त्याचा काही घातपात करण्याचा इरादा होता का? याचा पोलीस कसून तपास करत आहेत. 

 



दिल्लीत CAA वरून अलीकडेच हिंसाचार उफाळून आला होता. त्यामुळे दिल्लीत प्रचंड सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून खूप मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान राजधानी दिल्लीतील दंगलीच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज सतत तहकूब करावे लागले. दरम्यान, लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

संसदेत गोंधळ, काँग्रेसच्या सात खासदारांवर निलंबनाची कारवाई

Web Title: Sensational! one person entering in Parliament with live round in his pocket; When caught, he said forgot to keep outside pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.