मध्यप्रदेशात बलात्काराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ही बुधवारी रात्रीची घडलेली घटना आहे. एक मुलगी आपल्या भावासह तिच्या गावातून पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी आली होती. त्यानंतर आरोपीने भावाला मारहाण करुन विहिरीत फेकले. त्यानंतर आरोपीने तरुणीसोबत सामूहिक बलात्कार केला.
या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींपैकी तीन अल्पवयीन आहेत. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी मजुरीचे काम करायचे.ही खळबळजनक घटना बैतूल परिसरातील पाढरजवळ घडल्याचे सांगितले जात आहे. पाढरजवळच्या गावातील ही मुलगी आपल्या भावासोबत दुचाकीवरुन पाढर येथे आली होती, मुलीवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. असं सांगितलं जातंय की, आरोपींनी प्रथम त्या मुलीच्या भावावर हल्ला केला आणि नंतर त्याला जवळच्या एका विहिरीत फेकले. यानंतर या सात आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्काराची केला.पीडित मुलीने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकल करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेतील प्रत्यक्षदर्शी भावाचा भाऊ म्हणाला, “आम्ही बुधवारी रात्री आठ वाजता माझ्या बहिणीसमवेत पेट्रोल पंपावर पेट्रोल घ्यायला गेलो होतो आणि परत जात असताना आमच्या मोटारसायकलची हेड लाइट खराब झाली होती. त्यासाठी आम्ही थांबलो आणि हेड लाईट दुरुस्त करत होतो. पुढे तो म्हणाला, 'दोन मोटारसायकलवरून आमच्या पाठोपाठ 7 लोक आले. त्यातील तिघांनी प्रथम मला शिवीगाळ केली. त्यानंतर, मला पकडून विहिरीत फेकले आणि माझ्या बहिणीला घेऊन गेले. जेव्हा मी विहिरीतून बाहेर पडलो आणि कुटुंबाला याबाबत माहिती दिली. तेव्हा माझा भाऊ आणि एक बहीण माझ्यासोबत आले. आम्ही तिचा शोध घ्यायला सुरूवात केली. त्यावेळी आरोपी लोकेश पकडला गेला. त्याच्याकडून आधार कार्ड घेतले. आरोपी पकडला गेला, मात्र पोलिसांना बोलताच आरोपीने झटका देऊन तेथून पळ काढला.
बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको
Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी
सांगलीत एकाचा खून, मृतदेह पोत्यातून नदीत टाकला
Coronavirus : व्हॉट्स अॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून
सात आरोपींपैकी दोन आरोपी फरार आहेत. या घटनेनंतर लॉकडाऊनदरम्यान झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लॉकडाउन असताना सात जण दोन मोटारसायकलींवर कसे फिरत होते, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सध्या पोलिसही याचा तपास करत आहेत. त्याचवेळी, बैतूलचे एसडीओपी विजय पुंज सांगतात, 'पीडितेने पोलिसात अहवाल दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू झाला आहे.