सचिन वाझेसह मैत्रिणीच्या नावे अनेक कंपन्या; मीना जॉर्जने जबाबात उघड केल्या मोठ्या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:22 PM2021-09-08T20:22:39+5:302021-09-08T20:24:35+5:30
Sachin Vaze Case : मीनाने NIA ला सांगितले की, ती व्यवसायाने फिमेल एस्कॉर्ट होती. सचिन वाझेसोबत तिचे अनेक वर्षापासून संबंध होते. २०११ मध्ये सचिन वाझे आणि तिची भेट मुंबईतील एका ५ स्टार हॉटेलमध्ये झाली होती.
अँटिलीया स्फोटक प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे याचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सचिन वाझे याची मैत्रीण मीना जॉर्ज हिच्या घेतलेल्या जबाबात तिने काही मोठं मोठ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे . मीना जॉर्ज हिला सचिन वाझे याने काही महिन्यांपूर्वी ती करीत असलेली नोकरी सोडण्यास भाग पडले होते. नोकरी सोडल्यानंतर मीना जॉर्ज हिला सचिन वाझे हा दर महिना ५० हजार रुपये देत होता. मुंबई पोलीस खात्यात पुन्हा आल्यानंतर सचिन वाझे याने मीना जॉर्ज या महिलेला दोन वेळा अनुक्रमे ४० लाख व ३६ लाख दिले होते. मुंबईतील ओबेरॉय या हॉटेलमध्ये थांबलेल्या सचिन वाझे याने सदरची ही रक्कम मागवून घेतली होती. सचिन वाझे याने मीना जॉर्ज या महिलेसह मिळून काही कंपन्या सुरु केल्या होत्या. सचिन वाझे आणि मीना जॉर्ज यांच्या बँक लॉकरमधून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली असून एका कंपनीच्या माध्यमातून दिड कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
NIA च्या तपासात परमबीर सिंग(Param Bir Singh) आणि सचिन वाझे(Sachin Vaze) याच्याबाबत मोठे खुलासे झाले आहेत. ईशान सिन्हा नावाच्या सायबर एक्सपर्टकडून NIA दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट उघड झाले आहेत. मीनाने NIA ला सांगितले की, ती व्यवसायाने फिमेल एस्कॉर्ट होती. सचिन वाझेसोबत तिचे अनेक वर्षापासून संबंध होते. २०११ मध्ये सचिन वाझे आणि तिची भेट मुंबईतील एका ५ स्टार हॉटेलमध्ये झाली होती. तेव्हापासून वाझे पुन्हा पोलीस सेवेत येईपर्यंत दोघं रोज भेटत होते. सचिन वाझेच्या सांगण्यावरुन मीना जॉर्जने काही कंपन्या रजिस्टर केल्या होत्या. मुंबई पोलीस सेवेत परतल्यानंतर सचिन वाझेने मीनाला एस्कॉर्टची नोकरी सोडायला सांगितली. त्यानंतर वाझे पोलीस दलात आल्यापासून प्रति महिना ५० हजार रुपये खर्च मीनाला देऊ लागला.
इतकंच नव्हे तर दोन वेगवेगळ्या वेळी सचिन वाझेने मीनाला ४० लाख आणि ३६ लाख रुपये रोख रक्कम दिली होती. ओबेरॉय हॉटेलमध्ये राहताना हे पैसे सचिन वाझेने पुन्हा तिच्याकडून परत घेतले. NIA ला चौकशीत दोघांच्या संयुक्त लॉकरमध्ये अनेक रोख रक्कम सापडले.वाझेच्या सांगण्यावरुन मीनाकडून काही कंपन्या रजिस्टर केल्या होत्या. या कंपन्याच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचा व्यवहार पार पडला. तिच्या अकाऊंटला हे पैसे कोण पाठवत होतं ते फक्त सचिन वाझेलाच माहिती आहे. या अकाऊंटचे ब्लँक चेक स्वाक्षरी करून मी सचिन वाझेला द्यायची असं NIA च्या चौकशीत मीनाने कबुल केले.