महिला डॉक्टरच क्लिनिकमध्ये चालवत होती सेक्स रॅकेट; स्वत:ही करायची शरीरविक्रय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 06:04 PM2020-03-04T18:04:35+5:302020-03-04T18:06:09+5:30
शहरातील गर्दीच्या भागामध्ये हे सेक्स रॅकेट गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. मात्र, पोलिसांना याची जराशी कल्पनाही आली नव्हती.
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एक महिला डॉक्टरच क्लिनिकमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलीसांनी मारलेल्या छाप्यामध्ये 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गायत्री सिंह नावाची महिला डॉक्टरच तिच्या क्लिनिकमध्ये सेक्स रॅकेट चालवत होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हा छापा मारला आणि 10 जणांना ताब्यात घेतले. गायत्री सिंह रजिस्टर्ड प्रॅक्टीशनर नाही. तिच्याकडे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरीची डिग्री आहे. ती केवळ सेक्स रॅकेटच चालवत नाही तर स्वत:ही शरीरविक्रय करते, असे चौकशीत समोर आल्याचे गुन्हे शाखेच्या डीसीपी आदिती भवसार यांनी सांगितले.
शहरातील गर्दीच्या भागामध्ये हे सेक्स रॅकेट गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. मात्र, पोलिसांना याची जराशी कल्पनाही आली नव्हती. दररोज दुपारी हे क्लिनिक उघडले जात होते. ते रात्री उशिराही सुरु असायचे. क्लिनिकमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. यानंतर तिथे नजर ठेवण्यात आली. यानंतर एका महिला पोलिस कॉन्सेटबलला क्लिनिकमध्ये डमी सेक्स वर्कर म्हणून पाठविण्यात आले. तिने क्लिनिकमध्ये कामाची गरज असल्याचे सांगितले. यानंतर गायत्रीशी संपर्क साधला असता ती काम देण्यास तयार झाली.
कामाचे स्वरूप सांगताच पोलीस महिलेने टीमला सूचना दिली. यानंतर पोलिसांनी क्लिनिकवर छापा टाकला. यामध्ये 6 महिला आणि 4 पुरूषांना ताब्यात घेण्यात आले. गायत्रीचा पती डॉक्टर होता. त्याने हे क्लिनिक 1996 मध्ये भाड्याने घेतले होते. मात्र, त्यांचा 2000 मध्ये मृत्यू झाला. या वर्षापासून ती हे क्लिनिक चालवत होती.