राज कुंद्राच्या अटकेआधीच शिल्पा शेट्टीनं घेतला होता मोठा निर्णय; अडचणी कमी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 02:23 PM2021-07-24T14:23:48+5:302021-07-24T14:26:25+5:30

पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्रा अटकेत; शिल्पा शेट्टीची पोलिसांकडून ६ तास चौकशी

shilpa shetty resigns as director of raj kundras company vian industries | राज कुंद्राच्या अटकेआधीच शिल्पा शेट्टीनं घेतला होता मोठा निर्णय; अडचणी कमी होणार?

राज कुंद्राच्या अटकेआधीच शिल्पा शेट्टीनं घेतला होता मोठा निर्णय; अडचणी कमी होणार?

Next

मुंबई: पॉर्न फिल्म प्रकरणी पती राज कुंद्रा अडचणीत आल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी झाली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं काल शिल्पाची ६ तास चौकशी केली. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीला क्राईम ब्रांचकडून समन्स बजावलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिल्पानं राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीज कंपनीतील पदाचा आधीच राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. शिल्पा बऱ्याच व्यवसायांमध्ये राजची भागीदार आहे.

शिल्पा शेट्टी मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. या संपूर्ण प्रकरणात शिल्पाचा सहभाग किती होता याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. कंपनीतून झालेल्या आर्थिक लाभात शिल्पाचा काही वाटा होता का आणि असल्यास किती, याची शोध पोलीस घेत आहेत. क्राईम ब्रांचकडून शिल्पाची बँक खातीदेखील तपासली जात आहेत. वियान इंडस्ट्रीजमध्ये शिल्पानं किती दिवस संचालक म्हणून काम केलं, याचादेखील शोध घेतला जात आहे. पोलीस पुन्हा शिल्पाची चौकशी करू शकतात.

क्राईम ब्रांचचे अधिकारी वियान इंडस्ट्रीजमधील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासून पाहत आहेत. ऍप्ससाठी डिजिटल कंटेट होस्ट करणाऱ्या सर्व्हरमधून डेटा डिलीट करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचं ठरणार आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांचं पथक डिलीट करण्यात आलेला डेटा रिस्टोर करण्याचं काम करत आहेत. सट्ट्याशी संबंधित एका कंपनीनं कुंद्राच्या खात्यात मोठी रक्कम जमा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पॉर्न फिल्ममधून मिळणारा पैसा राजनं सट्टेबाजीसाठी वापरला का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.
 

Web Title: shilpa shetty resigns as director of raj kundras company vian industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.