वर्धा : नोकरीचे आमिष देत मुलाखतीकरिता फार्महाऊसवर नेवून एका विवाहितेवर सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी रात्री सेलसुरा येथे घडली. सावंगी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करीत रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सहाही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सिंदी (रेल्वे) येथील एका विवाहितेला पवनार येथील शेखर सुरेश चंदनखेडे याने नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सावंगी (मेघे) येथे बोलाविले. महिला पतीसह सावंगी येथे आल्यानंतर शेखरने तिच्या पतीला कारमध्ये बसवून सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. तेथे अगोदरच पाच युवक उपस्थित होते. पतीला बांधून ठेवत पीडितेवर सहाही युवकांनी आळीपाळीने अत्याचार केला. या युवकांच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर त्यांनी सावंगी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी शेखर सुरेश चंदनखेडे (२४), लोकेश उर्फ अभिजित गजानन इंगोले (२४), हेमराज बाबा भोयर (३९), नितीन मारोतराव चावरे (२७), राहुल बनराज गाडगे (२८) व पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (२६) यांना अटक केली.