धक्कादायक...! पतीने तलाक दिला; नातेवाईकासह सासऱ्याने बलात्कार केला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 09:28 AM2019-11-27T09:28:30+5:302019-11-27T09:28:59+5:30

पिडीता 25 वर्षांची असून तिचा विवाह 2015 मध्ये झाला होता.

Shocking ...! Husband gave triple talaq; A father-in-law raped with relative | धक्कादायक...! पतीने तलाक दिला; नातेवाईकासह सासऱ्याने बलात्कार केला

धक्कादायक...! पतीने तलाक दिला; नातेवाईकासह सासऱ्याने बलात्कार केला

Next

अलवर : राजस्थानमध्ये नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. पतीने तीनवेळा तलाक म्हणताच सासऱ्यासह नातेवाईकांनी महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार 22 नोव्हेंबरला राजस्थानच्या अलवर जिल्यातील एका गावामध्ये घडला आहे. पिडीत महिलेने भिवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली असली तरीही आरोपी अद्याप मोकाट आहेत. 


पिडीता 25 वर्षांची असून तिचा विवाह 2015 मध्ये झाला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी तिने मुलीला जन्म दिला. यानंतर तिचा पती आणि सासरचे माहेराहून हुंडा आणण्यासाठी त्रास देत होते. 


भिवाडीच्या डीएसपींनी सांगितले, तक्रारदार महिलेन सांगितले की 20 नोव्हेंबरला हुंडा न आणल्याने तिला सासरच्यांनी एका खोलीत कोंडून मारहाण केली. यानंतर दोन दिवसांनी 22 नोव्हेंबरला पतीने दारू पिऊन तलाक दिला. याच रात्री पिडीतेचा सासरा आणि अन्य एका नातेवाईकाने बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला. 


पोलिसांनी तक्रारीनंतर लगेचच वैद्यकीय चाचणी घेतली गेली. तसेच तिचा जबाबही नोंदविण्यात आला. मात्र, यावर अद्याप कारवाई झालेली नाही. 

Web Title: Shocking ...! Husband gave triple talaq; A father-in-law raped with relative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.