धक्कादायक! नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून पत्नीने पतीचे उडवले मुंडके
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 07:21 PM2019-05-30T19:21:43+5:302019-05-30T19:23:56+5:30
पत्नीचे नाव गुनेश्वरी बरकाटकी (४८) आहे.
लखीमपूर - पतीच्या नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून पत्नीने पतीचे मुंडकेच उडवले. धक्कादायक म्हणजे तेच मुंडके घेऊन ती पोलीस स्थानकात पोचली आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आसामच्या लखीमपुरमधील ही घटना असून पत्नीचे नाव गुनेश्वरी बरकाटकी (४८) आहे. तर मृत पतीचे नाव मुधिराम (५५) असं आहे.
गेली अनेक वर्षे पती आपल्याला नाहक त्रास देत होता असे आरोपी पत्नी गुनेश्वरी यांनी पोलिसांना सांगितले. अनेकवेळा त्याने कुर्हाडीने मारहाण करून जखमी केले. त्याला सोडून जाण्याचा मी खूप विचार केला. मात्र, मुलांमुळे मी गप्प बसले होते. परंतु ही गोष्ट हाताबाहेर गेली होती. आता जर मी त्याला मारले नसते तर त्याने माझा खून केला असता असेही पुढे गुनेश्वरी यांनी पोलिसांना माहिती दिली. गुनेश्वरी हिला पाच मुले आहेत. गुरुवारी तिने कुर्हाड्याने आपल्या पतीची हत्या केली आणि पाच किलोमीटरवर असलेल्या पोलीस स्थानकात एका प्लास्टिकच्या पिशवीत पतीचे मुंडके भरून घेऊन गेली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Assam: A woman killed her husband on 28 May&reached police station in Lakhimpur with his severed head. Says "He used to beat me up&injure me with axe. Thought of leaving him but didn’t due to children.Had to do it or he would've killed me." She was sent to judicial custody y'day. pic.twitter.com/BkyxdPzZMw
— ANI (@ANI) May 30, 2019