धक्कादायक! 5 वर्षांच्या मुलाला पित्यानेच पंचगंगा नदीत फेकले; आजारावर होणाऱ्या खर्चाला कंटाळून कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 10:28 AM2021-10-01T10:28:27+5:302021-10-01T10:30:45+5:30

सिकंदर हा काही दिवस घराबाहेर होता त्याला पत्नी व मेहुणा यांनी शोधून दोन दिवसांपूर्वी घरी आणले. परतल्यानंतर मुलाच्या औषधोपचारावरून त्याला खडे बोल सुनावले. त्यामुळे तो रागात होता.

Shocking News The 5-year-old boy was thrown into the Panchganga river by his father in Ichalkaranji kolhapur district | धक्कादायक! 5 वर्षांच्या मुलाला पित्यानेच पंचगंगा नदीत फेकले; आजारावर होणाऱ्या खर्चाला कंटाळून कृत्य

प्रतिकात्मक फोटो.

googlenewsNext


अतुल आंबी -

इचलकरंजी - कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका निर्दयी पित्याने औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून पोटच्या पाच वर्षीय मुलाला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार, त्याने स्वतःच पोलिसांसमोर कबुली दिल्याने उघडकीस आला. अफांन सिकंदर मुल्ला ( वय 5 रा. पंचगंगा साखर कारखाना रोड कबनूर) असे संबंधित मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पिता सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48) याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात, पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, सिकंदर मुल्ला हा अपंग असून मिळेल तेथे मजुरीचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तो अनेक वेळा घराबाहेरच असतो. त्याला दहा वर्षाची मुलगी व अफान अशी  दोन मुले आहेत. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे. अफान याला फिट्सचा आजार असल्याने औषधोपचाराचा खर्च त्याला झेपत नाही. या कारणावरूनही त्यांच्यात सतत वाद होत होता. सिकंदर हा काही दिवस घराबाहेर होता त्याला पत्नी व मेहुणा यांनी शोधून दोन दिवसांपूर्वी घरी आणले. परतल्यानंतर मुलाच्या औषधोपचारावरून त्याला खडे बोल सुनावले. त्यामुळे तो रागात होता.

दरम्यान काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी जावूया, असे सांगून तो सायकलवरून अफानला घेऊन घराबाहेर पडला. रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचे नातेवाईकांना सांगितले. परंतु त्याच्या बोलण्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही अफान सापडत नसल्याने नातेवाईक व नागरिकांनी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कसून चौकशी करता त्याने अफानला पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून फेकून दिल्याचे सांगितले. त्यामुळे रात्री उशिरा पोलिसांनी अफान याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधारामुळे शोध थांबवून शुक्रवारी सकाळपासून पुन्हा त्याचा शोध सुरू केला आहे.
 

Web Title: Shocking News The 5-year-old boy was thrown into the Panchganga river by his father in Ichalkaranji kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.