धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याची बायकोच निघाली 'कॉलगर्ल'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 08:19 PM2019-01-10T20:19:04+5:302019-01-10T20:20:37+5:30
मात्र, ती महिला चक्क एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पत्नी निघाली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. अधिक तपासात ती महिला पैश्यासाठी नाही तर मौज मजेसाठी कॉलगर्ल म्हणून काम करत होती.
लंडन - इंग्लंडमध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका पत्रकाराने हायप्रोफाईल कॉलगर्ल्स आणि हॉटेलांमध्ये चालणाऱ्या देहविक्रीचा गोरखधंदा उघडकीस आणला आहे. त्यामध्येच एका महिलेला अटकही करण्यात आली. मात्र, ती महिला चक्क एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पत्नी निघाली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. अधिक तपासात ती महिला पैश्यासाठी नाही तर मौज मजेसाठी कॉलगर्ल म्हणून काम करत होती.
लंडनच्यापोलिस विभागात मोठ्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याची पत्नी स्टिंग ऑपरेशनमध्ये देहविक्री करताना पकडली गेली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नाव आणि कुटुंबाची माहिती घेतली. तेव्हा त्यांना ती आपल्याच विभागातील बड्या अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे कळाले. आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी पोलीस ठाण्यात अटक करून आणली आणि तिच्यावर देहविक्रीचे आरोपही लागले. तिला कॉलगर्ल होण्याचे कारण विचारले तेव्हा अजून एक धक्का बसला. आपण पैसे कमविण्यासाठी हे काम करत नाही, तर केवळ मौज मजेसाठी करत आहोत अशी कबुली तिने दिली. एवढेच नव्हे, तर आपल्या कामाबद्दल पश्चाताप नसल्याचेही तिने सांगितले.
हीच माहिती जेव्हा पोलिसांनी तिच्या पतीला दिली तेव्हा पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण ज्या सुंदर आणि सुशील महिलेसोबत पती म्हणून राहतोय तिची प्रत्येक मागणी पूर्ण करतोय ती कॉलगर्ल निघेल याचा त्याने विचारही केला नव्हता. पीडित पतीने आपल्या पत्नीला सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. सोबतच, पोलिसांना तिच्याविरोधात योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.