आई-वडिलांच्या भांडणात चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर;अत्याचार झाल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:46 PM2019-09-27T13:46:57+5:302019-09-27T14:17:52+5:30
चिमुकलीच्या बापाचे आईसोबत कडाक्याचे भांडण झाल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
औरंगाबाद : मजूर कुटुंबातील ३ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी क्रांती चौक भागात उघडकीस आली. एका रिक्षात जात असताना दारूच्या नशेत असलेल्या चिमुकलीच्या बापाचे आईसोबत कडाक्याचे भांडण झाल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली. भांडणादरम्यान क्रांतीचौक या मध्यवर्ती स्थळी रस्त्यावर चिमुकलीचा मृतदेह फेकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सचिन यांचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. मंगळवारी सचिन (नावे बदली आहेत ) पत्नी रूपा मुलगा रवी, समीर, तीन वर्षीय मुलगी निर्भया व तीन महिन्यांची मुलगी कमला यांच्यासह मजुरीच्या कामासाठी इगतपुरी येथे रेल्वेने गेले. मात्र आधार कार्ड नसल्याने त्यांना तेथे काम नाकारण्यात आले. यामुळे हे कुटुंब औरंगाबादसाठी परत निघाले. परंतु ते चुकून दौंडला जाणाऱ्या रेल्वेत बसले. काही अंतरावर त्यांच्या हे लक्षात आले. यामुळे रेल्वे राहुरी येथे थांबली असता त्यांनी खाली उतरण्याचा ठरवले. गाडी दोन ते तीन मिनिटच थांबत असल्याने सचिन मुलगी ऐश्वर्या आणि दोन्ही मुलासह खाली उतरला. मात्र गडबडीत रूपा आणि दोन महिन्याच्या कमलासह रेल्वेतच राहिली. रात्री उशीर झाल्याने सचिन मुलगी निर्भया व दोन्ही मुलासह राहुरी स्टेशनवर मुक्कामाला थांबला. इकडे रुपा ही मनमाड रेल्वे स्टेशनला उतरली.
चिमुकली सकाळी रडत होती
बुधवारी सकाळी राहुरी स्टेशनवर सचिनला जाग आली तेव्हा चिमुकली निर्भया रडत होती. त्याने कारण विचारले असता तिच्या गुप्तांगाला जखम झाल्याचे आढळून आले. तेव्हा सचिन तिन्ही मुलासह मनमाडला पोहचला. याच दरम्यान रूपा कमलाला घेऊन औरंगाबादला आली. सचिन याने निर्भयाबद्दल सांगितल्याने ती मनमाडला गेली. येथून सर्वजण औरंगाबादला पोहचले. येथे मुकुंदवाडी येथील एका नातेवाईकाच्या घरी केले. यावेळी नातेवाईकांने निर्भयावर करणी झाल्याची शंका व्यक्त करत एका बाबाकडे जाण्याचे सुचवले. मात्र निर्भयाला घेऊन शिवाजी आणि लता शनीशिंगणापूरला गेले आणि परत आले. यानंतर सचिन कामासाठी मनमाडला गेला.
दरम्यान निर्भयाची तब्येत खालावली. यामुळे गुरुवारी रूंपा निर्भयाला घेऊन एका गंडादोरा करणाऱ्या बाबाकडे जाण्यास निघाली. मुकुंदवाडी येथे रिक्षाची वाट पाहत असताना निर्भयाला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि ती बेशुद्ध पडली. तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. रूपाने सचिनला ही माहिती देऊन त्याला परत बोलावले व ती नातेवाईकाच्या घरी गेली. रात्री उशिरा सचिन दारूच्या नशेत शहरात पोहंचला. धक्कादायक म्हणजे हे कुटुंब मृत निर्भयासह रात्रभर थांबले.
मृतदेहासोबत रात्र काढली
शुक्रवारी सकाळी रिक्षाने सचिन आणि रूपा मृत निर्भयासह रेल्वे स्टेशनकडे निघाले. यावेळी त्यांच्या दोघात रिक्षातच कडाक्याचे भांडण झाले. यामुळे रिक्षा चालकाने क्रांती चौकात रिक्षा थांबवत त्यांना खाली उतरण्यास सांगितले. यावरही दोघांत कडाक्याचे भांडण सुरूच होते. अचानक दारूच्या नशेतील सचिनने निर्भयाचा मृतदेह रस्त्यावर फेकला. हा सर्व प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी दाखल होत मृतदेह आणि सचिन व रुपाला ताब्यात घेतले.
चिमुकलीवर अत्याचाराचा संशय
मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आला आहे. शवविच्छेदन अवहाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता ऐश्वर्यावर अत्याचार झाल्याचा संशय पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.