धक्कादायक! फेसबुक लाईव्ह करत तरुणाने संपविले आयुष्य, पगार न मिळाल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
By पूनम अपराज | Published: October 12, 2020 03:44 PM2020-10-12T15:44:00+5:302020-10-12T15:46:19+5:30
Suicide : नातेवाईकांनी यासंदर्भातील पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
हरियाणामध्ये हिसार येथे एक धक्कादायक प्रकार घडला. हिसारमध्ये त्रिवेणी विहार कॉलनीत राहणाऱ्या ३० वर्षीय पवन उर्फ पोनीने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. या तरुणाने फेसबुक लाईव्ह करत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. नातेवाईकांनी यासंदर्भातील पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
कुटुंबियांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत अधिक माहिती देताना तपास अधिकारी एएसआय सतपाल सिंह यांनी सांगितलं की, उकलानाच्या शहरातील त्रिवेणी विहार येथील ३० वर्षीय पवनने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, तपास अधिकारी सतपाल यांनी सांगितले की, मृत पवनचा चुलत भाऊ चंद्रमोहन याच्या तक्रारीवरून 4 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पवनच्या चुलत भावाने ट्रक ट्रेलर चालवत होता. पवन एका कंपनीच्या ट्रक ट्रेलर चालवत असे आणि त्याला काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जात होता. कंपनीने कित्येक महिन्यांपासून पगार न दिल्याने पवन अस्वस्थ होता. या मानसिक त्रासामुळे पवनने गळफास लावून आत्महत्या केली, असे सांगितले. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. कंपनीने कित्येक महिन्यांपासून पगार न दिल्याने पवन अस्वस्थ होता. या मानसिक त्रासामुळे पवननं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे.