मुंबई - प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडीस व त्याच्या बॅंडच्या 9 सदस्यांची सुमारे 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी पाच तक्रारदार आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार घेऊन आले आहेत. त्यामुळे फसवणूकीची रक्कम सुमारे 23 कोटींवर पोहोचली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 (एमपीआयडी) अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. फाईंडिग फॅनी सारख्या चित्रपटांसाठी तसेच स्वच्छ भारत अभियानासाठी गायन केलेल्य रॉडनीच्या तक्रारारीनुसार, 2015 मध्ये रॉडनीची ओळख मयुर अगरवाल याच्यासोबत झाली. त्याने त्याचे गुजरातमधील मामा संजय अग्रवाल यांच्यामार्फत जमिनीमध्ये पैसे गुंतवून 18 ते 22 टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्यानुसार ऑक्टोबर 2015 पासून रॉडनीने त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तसेच रॉडनीने यापूर्वी खरेदी केलेले सोन्याचीही अग्रवालांकडे गुंतवणूक केली. असे एकूण पंधरा कोटी साठ लाख रुपये 2018पर्यंत अगरवालकडे जमा करण्यात आले. सुरुवातीला 2016 पर्यंत रॉडनीला अग्रवालने नियमित व्याजाचे पैसे दिले त्यामुळे त्याच्या बॅण्डमधील इतर 9 सदस्यांनीही अग्रवालांकडे सुमारे दोन कोटी पंधरा लाख रुपये गुंतवले. 2017 नंतर व्याजाची रक्कम मिळण्यास बंद झाल्यामुळे रॉडनी व त्याच्या सहकलाकारांनी 17.77 कोटींची फसवणूक झाल्याचीआर्थिक गुन्हे शाखेकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार या प्रकरणी संजय अग्रवाल, मयूर अग्रवाल बंगेरा व लोहादीया यांच्याविरुद्ध 25 फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. फर्नांडीसप्रमाणेच फसवणूक झालेले आणखी पाच तक्रारदार पोलिसांकडे आले असून त्यामुळे याप्रकरणातील फसवणूकीची रक्कम 23 कोटींवर पोहोचली आहे.
गायक रॉडनी फर्नांडिस फसवणूक प्रकरणात आणखी तक्रारदारांची पोलिसांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 9:51 PM
आणखी तक्रारदार पोलिसांकडे; फसवणूकीची रक्कम23 कोटींवर
ठळक मुद्देपोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 (एमपीआयडी) अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. 2017 नंतर व्याजाची रक्कम मिळण्यास बंद झाल्यामुळे रॉडनी व त्याच्या सहकलाकारांनी 17.77 कोटींची फसवणूक झाल्याचीआर्थिक गुन्हे शाखेकडे याप्रकरणी तक्रार केली. फर्नांडीसप्रमाणेच फसवणूक झालेले आणखी पाच तक्रारदार पोलिसांकडे आले असून त्यामुळे याप्रकरणातील फसवणूकीची रक्कम 23 कोटींवर पोहोचली आहे.