दंगलप्रकरणी आणखी सहा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:37 AM2018-07-30T00:37:41+5:302018-07-30T00:37:52+5:30

मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढल्यानंतर दंगल माजवणाऱ्यांपैकी वागळे इस्टेट पोलिसांनी आणखी पाच, तर नौपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे यातील अटक आरोपींची संख्या आता ५४ झाली आहे.

 Six more accused in the riots | दंगलप्रकरणी आणखी सहा अटकेत

दंगलप्रकरणी आणखी सहा अटकेत

Next

ठाणे : मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढल्यानंतर दंगल माजवणाऱ्यांपैकी वागळे इस्टेट पोलिसांनी आणखी पाच, तर नौपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे यातील अटक आरोपींची संख्या आता ५४ झाली आहे.
सुरुवातीला या दंगल प्रकरणात नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, निरीक्षक संजय धुमाळ आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या पथकाने शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे यांच्यासह २३ जणांना, त्यापाठोपाठ पाच अशा २८ जणांना अटक केली होती. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण, पोलीस निरीक्षक सीताराम वाघ आणि संजय गायकवाड यांच्या पथकानेही सुरुवातीला राजेश बागवे या मनसे पदाधिकाºयासह १३ जणांना त्यापाठोपाठ सात अशा २० जणांना अटक केली. त्यानंतर, २८ जुलै रोजी नौपाडा पोलिसांनी संदीप यादव (रा. रामचंद्रनगर) याला अटक केली. वागळे इस्टेट पोलिसांनी आकाश जोशी (२६, रा. किसननगर), अनिकेत गावडे (१९, रा. लोकमान्यनगर, पाडा क्रमांक ४), आकाश साबळे (२६, शांतीनगर, वागळे इस्टेट), सुरेश पोळ (२५, रा. रामचंद्रनगर) आणि रमेश गायकवाड (२४, रा. मानपाडा, आझादनगर, ठाणे) या पाच जणांना अटक केली. त्यामुळे यातील अटक आरोपींची संख्या ५४ झाली आहे.
बंद आणि आंदोलनादरम्यान हिंसक कारवाया करणाºयांवरच कारवाई केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. दरम्यान, आंदोलनानंतर अनेकांची धरपकड झाल्याने आरोपींच्या कुटुंबीयांनी सलग तिसºया दिवशीही नौपाडा पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कसून चौकशी
या सहाही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. अटकेतील आरोपींच्या व्यतिरिक्त दंगलीशी संबंधित अनेकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यात तथ्य आढळल्यानंतरच आणखी आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायकगावकर यांनी सांगितले.

Web Title:  Six more accused in the riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.