झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यात तीन पत्नींच्या वादातून सासरच्या मंडळींनी ३५ वर्षीय पतीची निर्घृण हत्या केली. जमशेदपूरच्या गुडाबांडा येथे पोलिसांनी लाडू हैबुरूच्या हत्येचा पर्दाफाश केला आहे. डुमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नक्षलवादग्रस्त परिसरातील विहिरीत लाडू हैबुरूचा सांगाडा सापडला, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.
डुमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नक्षलग्रस्त परिसरातील विहिरीत एक सांगाडा सापडला होता. १६ मार्च रोजी लाडू बेपत्ता झाला होता. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. अफवा पसरल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तीन पत्नींपैकी एकीच्या भावाशी भांडण झाल्यानंतर लाडू हैबुरू बेपत्ता झाला होता. तिसऱ्या लग्नावरून त्याचे भांडण झाले होते. सुरुवातीला लाडूचे कुटुंब काहीही माहिती देण्यास नकार देत होते. पोलिसांनी त्याची आई नंदी यांना विश्वासात घेतले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक एम. तमिळ वनान यांनी सांगितले.
माजी आमदाराला कोर्टाने दिला दणका; डबल मर्डरप्रकरणी सुनावली जन्मठेपेची शिक्षा
शुक्रवारी लाडू हैबुरूचा मेहुणा आणि इतर तिघांना पोलिसांनी पकडले. यानंतर घाटशिला उपविभागातील घोरबंद पोलीस ठाण्याअंतर्गत माडोटोलिया गावात घरापासून १० किमी अंतरावर नक्षलग्रस्त जागेवरून हैबुरूचा सांगाडा सापडला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. लाडूवर पहिल्या पत्नीने मारहाण केल्याचा आरोप केला होता. लाडूने तिघींशी लग्ने केले होते. परंतु, दोघींसोबत राहत होता. एकीशी त्याचे जमत नव्हते. यामुळे तिसऱ्या पत्नीच्या घरी पंचायत बोलवण्यात आली होती. पंचायतीतूनच लाडूनला उचलून नेत हत्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.