गुरुग्राम - हरियाणा येथील गुरुग्राममध्ये भाजपाच्या एका महिला नेत्याला तिच्या पतीने गोळ्या घालून हत्या केली आहे. मुनेश गोदारा (३४) असे या मृत महिलेचे नाव आहे. मृत महिला हरियाणा भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश सचिव आणि भाजपाचे एक उदयोन्मुख महिला नेत्या होत्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कालच मुनेश गोदारा यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार केला होता. पक्षाच्या कामासंदर्भात मुनेश गोदारा यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही भेट दिली होती. मात्र, विवाहबाह्य संबंधामुळे गोदारा दाम्पत्यामध्ये सतत भांडणं होतं. मुनेश बहीण मनीषासोबत फोनवर बोलत असताना दारूच्या नशेत असलेल्या तिच्या नवऱ्याने गोळ्या घालून तिची हत्या केली.
गुरुग्राममधील सेक्टर ९३ मध्ये गोदारा दाम्पत्य भाड्याच्या घरात राहत होते. मुनशचा भाऊ एस. के. जाखर यांनी सांगितले की, मुनेश ही तिची मोठी बहीण मनीषासोबत फोनवर बोलत असताना तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मुनेशचे सासरे चंद्रभान हे चरखी दादरी येथे राहत असून त्यांचा मुलगा सुनील हा सोसायटीच्या आठव्या मजल्यावर राहतो अशी माहिती त्यांनी गुरुग्राम पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनेशचा नवरा सुनील (३४) याचा मुनेशच्या चारित्र्यावर संशय होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी पती फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. ही घटना शनिवारी रात्रीची आहे.
चारित्र्यावर संशय घ्यायची पतीसुनील चरखी दादरी येथील रहिवासी असून गुरुग्रामच्या सेक्टर-९३ मध्ये भाड्याच्या घरात राहत होता. मुनेश गोदारा यांचे सासरे चंद्रभान यांनी गुरुग्राम पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांचा मुलगा सुरक्षा अधिकारी होता आणि तो सोसायटीच्या ८ व्या मजल्यावर राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचा एका पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. यामुळे दोघांमध्ये वाद होत असत.
पत्नी फोनवर बोलली आणि पतीने झाडल्या गोळ्या शनिवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे चंद्रभान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सुनीलने त्यावेळी मद्यपान केले. या दरम्यान मुनेश आपल्या घराच्या किचनमध्ये गेली आणि कुणाशी फोनवर बोलला. यावर सुनीलला खूप राग आला. त्याने आपली सर्व्हिस रिवॉल्व्हर काढून मुनेशच्या छातीत आणि पोटात गोळ्या झाडल्या. जागेवरच मुनेशचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतर आरोपी सुनील घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. मुनेश या झज्जर जिल्ह्यातील नौगावचा रहिवासी असून पक्षाच्या कामात सहभाग घेत असत.