मामीसोबत सुरू होतं बापाचं अफेअर, मुलाने संपत्तीसाठी सुपारी देऊन काढला काटा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:03 AM2021-06-02T10:03:09+5:302021-06-02T10:03:56+5:30

अनैतिक संबंधाच्या रागातून मुलाने वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Son killed father due to illegal relation with relative women at Patna Bihar | मामीसोबत सुरू होतं बापाचं अफेअर, मुलाने संपत्तीसाठी सुपारी देऊन काढला काटा...

मामीसोबत सुरू होतं बापाचं अफेअर, मुलाने संपत्तीसाठी सुपारी देऊन काढला काटा...

Next

बिहारची राजधानी पटणा येथील पवित्र नात्यांना काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधाच्या रागातून मुलाने वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फतुहा दनियावा मार्गावर मुंडेरा गावाजवळ गेल्या ९ फेब्रुवारीला अनुरोध कुमार हत्याकांड केसबाबत पोलिसांनी खुलासा केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनुसार अनैतिक संबंधामुळे मृतकाच्या मुलाने सुपारी देऊन वडिलांची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा सोनू उर्फ कारू आणि हत्याकांडमध्ये लायनरची भूमिका निभावणारे मृत अनुरोध कुमारचा ड्रायव्हर जितेंद्र कुमार उर्फ मुन्नाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्ड म्हटल्या जाणाऱ्या महिलेनेच केल मेहुल चोकसीचं अपहरण? सीक्रेट ऑपरेशनमध्ये अडकला चोकसी!)

असे सांगितले गेले की मृत अनुरोध कुमार याचं त्याच्या मेहुणीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. ज्यावरून त्याचा मुलगा सोनू उर्फ कारू नेहमीच वडिलांना विरोध करत होता. मुलाला शंका होती की, मामीसोबत अनैतिक संबंध ठेवून वडील आपली संपत्ती लुटवत आहेत.

याच कारणावरून मुलगा सोनू आणि ड्रायव्हर जितेंद्र कुमारने हत्येचा प्लॅन केला. त्यांनी काही गुडांना आपल्या वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. फतुहा एसडीपीओ राजेश कुमार मांझी यांनी सांगितले की, अनैतिक संबंधावरून मृतकाचं आपल्या मुलासोबत नेहमीच भांडण होत होतं. मुलानेच या कारणाने वडिलांची सुपारी देऊन हत्या करून घेतली. (हे पण वाचा : धक्कादायक! जवानाने धावत्या ट्रेनमधून अल्पवयीन मुलीला फेकलं; अतिप्रसंगास विरोध केल्यानं कृत्य)

९ फेब्रुवारीला दुचाकीस्वारांनी अनुरोध कुमारवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की,, सुरूवातीला पोलिसांसाठी ही एक ब्लाइंड केस होती. मात्र पोलिसांनी पुराव्याच्या आधारावर ही केस सॉल्व केली आणि आरोपींचा पत्ता काढला. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सुपारी देण्यात आलेल्या मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
 

Web Title: Son killed father due to illegal relation with relative women at Patna Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.