कौटुंबिक कारणामुळे कंपनीचा उपाध्यक्ष बनला सोनसाखळी चोर  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:50 PM2018-12-18T18:50:53+5:302018-12-18T18:52:19+5:30

सुमित सेनगुप्ता (वय ३५) असं या अटक आरोपीचं नाव असून कौटुंबिक कारणामुळे त्याने दरमहा अडीच लाख रुपयांची नोकरी सोडली होती असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

Sonasakalhi Chor became the company's vice president due to family reasons | कौटुंबिक कारणामुळे कंपनीचा उपाध्यक्ष बनला सोनसाखळी चोर  

कौटुंबिक कारणामुळे कंपनीचा उपाध्यक्ष बनला सोनसाखळी चोर  

Next
ठळक मुद्देकार चोरी आणि सोनसाखळी चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे १२ डिसेंबरला वाशीत महिलेची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी २४ तासांच्या आत सेनगुप्ता आणि त्याचा सहकारी नितीन अग्रवाल (वय २५) याला अटक केलीकार चोरल्यानंतर ३ दिवसानंतर त्याने सोनसाखळी चोरी केली

नवी मुंबई - एका कंपनीचा उपाध्यक्ष असलेल्या वाशी येथील एका व्यक्तीला, कार चोरी आणि सोनसाखळी चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुमित सेनगुप्ता (वय ३५) असं या अटक आरोपीचं नाव असून कौटुंबिक कारणामुळे त्याने दरमहा अडीच लाख रुपयांची नोकरी सोडली होती असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

तपास अधिकारी विकास गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये सुमितच्या पत्नीने त्याच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात छळाप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. वैयक्तिक कारणांमुळे तो त्रस्त होता. नोकरी नसल्यामुळे हाय- फाय जीवन जगणारा सुमित पैशांअभावी त्रासला  होता. त्याला दारुचे व्यसन जडले होते. सुमितने एका मोठ्या शैक्षणिक संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो पुण्यातील एका चांगल्या कंपनीत काम करत होता. तपास अधिकारी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही १२ डिसेंबरला वाशीत महिलेची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी २४ तासांच्या आत सेनगुप्ता आणि त्याचा सहकारी नितीन अग्रवाल (वय २५) याला अटक केली होती. जेव्हा त्यांनी सोनसाखळी चोरली तेव्हाही ते चोरीच्या कारमध्ये होते. ९ डिसेंबर रोजी वाशीतील फोर्टिस रुग्णालयाबाहेर वाहन चालकाला मारहाण करुन सुमितने गुन्ह्यासाठी वापरलेली कार पळवली होती. कार चालकाला घाबरवण्यासाठी त्याने त्याच्या डोक्याला लोखंडाची बंदुकीसारखी वस्तू लावली होती. कार चोरल्यानंतर ३ दिवसानंतर त्याने सोनसाखळी चोरी केली. २०१७ मध्ये वाशी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आणखी एका चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरोधात आणखी दुसऱ्या कुठल्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे की याबाबत पोलीस माहिती गोळा करत आहेत.  

Web Title: Sonasakalhi Chor became the company's vice president due to family reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.