कल्याण : कुमार ज्वेलर्सच्या संचालकांच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:14 PM2022-02-24T12:14:54+5:302022-02-24T12:15:44+5:30

गुंतवणूकदारांची घालमेल : कष्टाची पुंजी गमावल्याने अनेक हवालदिल

Special team set up to search for directors of Kumar Jewelers kalyan | कल्याण : कुमार ज्वेलर्सच्या संचालकांच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन

कल्याण : कुमार ज्वेलर्सच्या संचालकांच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन

Next

कल्याण : ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून ज्वेलर्स पसार होण्याची कल्याण डोंबिवलीतील गेल्या चार वर्षांतील तिसरी घटना आहे. आधीच्या दोन घटनांमध्ये गुडविन आणि प्रथमेश हे डोंबिवलीतील ज्वेलर्स फसवणूक करुन परागंदा झाले. आता कल्याणमध्ये  मे. एस. कुमार ज्वेलर्स फसवणूक करून बेपत्ता झाल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. अनेकांनी आपल्या घरातील मुलींच्या लग्नाकरिता सोन्याचे दागिने घडवण्याकरिता गुंतवणूक केली होती. मात्र त्यांच्या पदरी घोर निराशा आली. ज्वेलर्सच्या संचालकांच्या शोधाकरिता पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली.

रामबाग परिसरातील अविनाश पाटील या तरुणाने आपल्या मिळकतीतून काही रक्कम बचत म्हणून मे. एस. कुमार गोल्ड अँण्ड ज्वेलर्समध्ये गुंतवली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने या ज्वेलर्सकडून चेन बनविली होती. तेथील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे ११ महिने पैसे गुंतविल्यास १२ व्या महिन्यात चांगला परतावा मिळेल असे आमिष पाटील यांना दाखवले. डिसेंबर २०२० पासून पाच हजार महिने बचत करण्यास सुरुवात केली. सात महिने पैसे गुंतवले. 

कोरोनाच्या प्रादुर्भावात मार्च-एप्रिलच्या लॉकडाऊनमध्ये दोन महिने दुकान बंद राहिले. परंतु बचत प्रक्रिया सुरूच राहिली. अनलॉकमध्येही कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे कारण देत ज्वेलरने दुकान बंद ठेवले. वॉचमन आम्हाला हीच माहिती देत होता. कालांतराने वॉचमनदेखील गायब झाले. पासबुकवरील दूरध्वनी क्रमांक बोगस निघाल्याने आपली फसवणूक झाल्याची शंका आली. त्यामुळे थेट पोलीस ठाणे गाठले. 

२७ ग्राहकांची तक्रार 
मे. एस. कुमार ज्वेलर्सच्या संचालकांविरुद्ध आतापर्यंत २७ ग्राहकांनी तक्रार केल्याने मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर  तक्रारदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपासाकरिता विशेष पथकांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी दिली.

Web Title: Special team set up to search for directors of Kumar Jewelers kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.