क्लासरुममध्ये शिरला अन् दोन मुलींचे कपडे उतरवले, लघुशंकाही केली; दिल्लीच्या शाळेत धक्कादायक घटना!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 10:03 AM2022-05-05T10:03:48+5:302022-05-05T10:04:47+5:30

दिल्लीतील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेची प्रार्थना झाल्यानंतर इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थी वर्ग शिक्षिका येण्याची वाट पाहात होते. तेवढ्यात एक अनोखळी व्यक्ती वर्गात शिरला.

Stranger Assaults 2 Girls In Class And Flees Bhajanpura Delhi Mcd School | क्लासरुममध्ये शिरला अन् दोन मुलींचे कपडे उतरवले, लघुशंकाही केली; दिल्लीच्या शाळेत धक्कादायक घटना!

क्लासरुममध्ये शिरला अन् दोन मुलींचे कपडे उतरवले, लघुशंकाही केली; दिल्लीच्या शाळेत धक्कादायक घटना!

googlenewsNext

नवी दिल्ली-

दिल्लीतील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेची प्रार्थना झाल्यानंतर इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थी वर्ग शिक्षिका येण्याची वाट पाहात होते. तेवढ्यात एक अनोखळी व्यक्ती वर्गात शिरला. त्यानं थेट वर्गातील दोन मुलींना पकडून त्यांचे कपडे उतरवले आणि अश्लील बोलू लागला. वर्गातील सर्व विद्यार्थिनी घाबरल्या आणि किंचाळू लागल्या. पण नराधम काही थांबला नाही. त्याचे अश्लील चाळे सुरूच होते. त्यानं थेट सर्वांसमोर लघुशंका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो वर्गातून पळून गेला. शिक्षणाच्या मंदिरात अशा प्रकराची घटना घडणं खरंतर खूप संतापजनक बाब आहे. पण त्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट म्हणजे शाळा प्रशासनानं ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला. राजधानी दिल्लीच्या भजनपुरा परिसरतील एका एमसीडी शाळेत ३० एप्रिल रोजी घडलेली ही घटना आहे. 

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना हे प्रकरण कळले आणि त्यानंतर शाळा प्रशासनात खळबळ उडाली. दिल्ली महिला आयोगाने (DCW) पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या शाळेतील दोन मुलींच्या लैंगिक छळाचा आरोप करत महामंडळाच्या आयुक्तांना समन्स बजावले आहेत. यासोबतच आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

8 वर्षाच्या मुलीसोबत घडली भीषण घटना
मुलींचे वय 8 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली महिला आयोगाने या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. भजनपुरा भागात असलेल्या एमसीडी शाळेत त्या दिवशी शाळेची बैठक संपल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात आपल्या शिक्षकांची वाट पाहत होते. त्यानंतर वर्गात अज्ञात व्यक्तीने येऊन एका मुलीचे कपडे काढून अश्लील बोलण्यास सुरुवात केली. यानंतर तो दुसऱ्या मुलीकडे गेला आणि तिचे कपडेही काढले. यानंतर तो वर्गातच लघुशंका करू लागला. आयोगाचे म्हणणे आहे की जेव्हा मुलींनी वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली तेव्हा त्यांनी त्यांना शांत राहण्यास सांगितलं आणि घटना विसरून जाण्यास सांगितलं.

आरोपीचं स्केच तयार, दोन संशयितांची ओळख पटली
डीसीपी संजय सैन यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. शाळकरी मुलींच्या जबाबाच्या आधारे संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. या आधारे दोन संशयितांची ओळख पटली आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. डीसीपींनी सांगितले की, ती महापालिकेची शाळा आहे आणि तेथे सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. मात्र, संशयिताची ओळख पटवण्यासाठी जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस पथकाला मदत करण्यासाठी तांत्रिक पथकं तैनात करण्यात आली आहेत.

आयोगानं उद्यापर्यंत मागितला अहवाल
आयोगाने तत्काळ दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे तसेच पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तांना ६ मे रोजी दुपारी २ वाजता बोलावून सविस्तर अहवाल मागवला आहे. यासोबतच शाळेच्या सुरक्षेतील हा हलगर्जीपणाचे कारण स्पष्ट करून जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. पोलिसांना गुन्ह्याची तक्रार न केल्याबद्दल आणि तो लपविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल POCSO कायद्यांतर्गत शाळेच्या मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकावर केलेल्या कारवाईबद्दल आयोगाने दिल्ली पोलिस आणि MCD कडून माहिती मागवली आहे.

सीसीटीव्ही फुटेजही मागितले
आयोगाने महापालिकेला शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तसेच शाळेत येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी केलेल्या तरतुदींचा तपशील द्यावा, तसेच शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यास महापालिका आयुक्तांना कळवावे, असेही आयोगाने महापालिकेला सांगितले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी महामंडळाकडे पाठवलेल्या प्रलंबित प्रस्तावांचा अहवाल देण्यासही सांगितलं आहे.

Web Title: Stranger Assaults 2 Girls In Class And Flees Bhajanpura Delhi Mcd School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.