कंपनीला खोटी बिले सादर करीत पावणेसहा कोटींना घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 02:54 AM2020-03-18T02:54:08+5:302020-03-18T02:54:28+5:30
तक्रारदार व्यावसायिक असून त्यांच्या दोन कंपन्या आहेत. दोन्ही कंपनी या वेगवेगळ्या कंपन्यांकडून कच्चा माल खरेदी करून ते अन्य कंपन्यांना देतात.
मुंबई : खोटी बिले सादर करत एका नामांकित कापड कंपनीला पावणेसहा कोटींना गंडा घातल्याची घटना आझाद मैदान येथे सोमवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार व्यावसायिक असून त्यांच्या दोन कंपन्या आहेत. दोन्ही कंपनी या वेगवेगळ्या कंपन्यांकडून कच्चा माल खरेदी करून ते अन्य कंपन्यांना देते, त्यानंतर कंपनीकडून पक्के कापड तयार करून त्याची विक्री करत असे. या कंपनीच्या मालाचे गोडाऊन हे राजस्थान आणि
भिवंडीत आहे. याच दरम्यान १ आॅगस्ट २०१९ ते १४ फेब्रुवारी २०२० पर्यंतच्या काळात कंपनीसाठी कापड विक्री करणाऱ्या कंपनी नामे एस.एन.पी. इंटरनॅशनल कंपनी, सुमीत टेड्रर्स कंपनी, राजेश सेल्स एजन्सी तसेच हरीहर टेक्सटाईल कंपनी यांनी संगनमत करून माल मिळाला असल्याची खोटी बिले तयार केली. ती बिले कंपनीस सादर करून कंपनीची तब्बल ५ कोटी ७० लाख रुपयांना फसवणूक केली आहे.