मुंबई - ‘पेज थ्री’ वर्तुळात ड्रग्ज तस्करी (पेडलर) करणारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जया सहा हिला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी समन्स पाठविले. सुशांतची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्तीसमवेत तिचा ड्रग्जच्या वापराबाबतचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्याने तिची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर सुशांतच्या बँक अकाउंटमध्ये यासंदर्भात व्यवहार झाला आहे का, हे तपासले जणार असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.
जया सहा पूर्वी सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदीच्या टीममध्ये कामाला होती. केव्हन्ट टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून ती काम करते. पेज थ्री पार्टीत ती अमलीपदार्थ पुरवते, असे सांगितले जाते. सुशांतच्या बँक खात्यावरून तिच्या खात्यात काही रक्कम वर्ग केली. त्यानंतर ती तिच्या खात्यावरून रिया व तिचा भाऊ शोविकच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्याचे समोर आले आहे. याची ईडी चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये एमडीएमएचा उल्लेखरिया चक्रवर्तीच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये एमडीएमए, गांजा अशा उत्तेजक पदार्थांचा उल्लेख आहे. जया सहा हिला तिने ड्रग्जच्या वापराबाबत विचारल्यावर तिने ‘चहा किंवा पाण्यात ४ थेंब वापर आणि त्याला पिऊ दे,ङ्घकिक बसायला ३०-४० मिनिटे दे’ असा मेसेज केला आहे. एका कथित चॅटमध्ये रियाने गौरव आयरा नावाच्या संशयित ड्रग्ज विक्रेत्याशी संभाषण केले आहे. ती म्हणते, ‘हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचे तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला’. या मेसेजनंतर ‘आपल्याकडे एमडीएमए आहे का?’ असा मेसेज तिने ८ मार्च २०१७ रोजी केला होता.
अन्य एका संभाषणात रियाच्या फोनमध्ये ‘मिरांडा सुशी’ म्हणून सेव्ह केलेल्या नंबरवरून सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाचा, ‘हाय रिया, स्टफ (माल) जवळजवळ संपला आहे,’ असा रियाला मेसेज आहे. त्यानंतर मिरांडा रियाला विचारतो, ‘शोविकच्या (रियाचा भाऊ) मित्राकडून आपण ते घ्यायला पाहिजे का? पण त्याच्याकडे नुसतेच हॅश अॅण्ड बड (कमी प्रतिचे ड्रग्ज) आहे.’रियाने ड्रग्जचे सेवन केले नसल्याचा वकिलांचा दावारियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. ती रक्त तपासणीसाठी तयार आहे, असा दावा तिचे वकील अॅड. सतीश माने-शिंदे यांनी केला आहे.
सुशांतने रियाला दिले होते ड्रग्ज सोडण्याचे आश्वासनसुशांतला ड्रग्जचे व्यसन असून यातून बाहेर पडण्याचे त्याने आश्वासन दिल्याचा व्हॉट्सअॅप मेसेज रियाने सुशांतची माजी व्यवसाय व्यवस्थापक श्रुती मोदीला केल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात आता पुढील तपास हाती घेण्यात आल्याचे समजते.मानवाधिकार आयोगाची ‘कूपर’ला नोटीससुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाने पालिकेच्या कूपर रुग्णालयाला आणि मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने रुग्णालयातील शवागारात सुशांतच्या मृतदेहाची पाहणी केली होती. केवळ कुटुंबातील व्यक्तींनाच शवागारात परवानगी दिले जाते. मग, रियाला मृतदेहाची पाहणी कशी काय करू दिली? याबाबत आयोगाने स्पष्टीकरण मागविले आहे.