मुंबई - अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या 'ड्रग कनेक्शन'चा शिताफीने तपास करीत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) बुधवारी अचानकपणे काहीसा थंडावला. आहे. तपास पथकातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तातडीने पूर्ण पथक क्वारटाईन करण्यात आले असून आता प्रत्येकाची चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवस तपास कामाला ब्रेक लागणार आहे.
दरम्यान, चौकशीसाठी बोलाविण्यात आलेल्या सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, टेलेन्ट मॅनेजर जया सहा यांना परत पाठविण्यात आले. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने आतापर्यंत अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकसह एकूण 18 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये बहुताशजण अंमली पदार्थाची तस्करी करणारे आहेत. तिघांचा अपवाद वगळता अन्य सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. एनसीबीची त्याच्याकडे चौकशी सुरु असतानाच पथकातील एका अधिकाऱ्याला दोन दिवसापासून ताप, अंगदुखी व सर्दीचा त्रास जाणवत होता. कोरोनाची लक्षणे असल्याने त्याचा स्वब तपासणीसाठी घेण्यात आला होता. बुधवारी त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे सर्व पथक काहीसे तणावात आले असून खबरदारी म्हणून त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. तटीममधील सर्वांची आणि तो अधिकारी ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या सर्वांची टेस्ट घेतली जाणार असल्याचे एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.
दरम्यान, ड्रग्जबद्दल रियाच्या मोबाईल चॅटवर संभाषण आढळून आलेल्या सुशांतचे माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांना बुधवारी एनसीबीने चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले होते, त्यानुसार त्या सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यालयात पोहचल्या. मात्र त्यांना तातडीने परत पाठविण्यात आले असून काही दिवसांनी त्यांना परत बोलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता काहीसा थंडावला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता
प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका
दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा
सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा