पणजी - सुशांत सिंग राजपूत मृत्यु प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (NCB) पथक गोव्यात दाखल झाले आहे. गोव्यातील एका हॉटेल मालकाचा या प्रकरणाशी संबंध उघडकीस आणल्यामुळे त्याचा तपास पथक करीत आहे.
गोवास्थीत हॉटेल उद्योजक गौरव आर्या याची हे पथक चौकशी करीत आहे. सुशांत सिंगच्याया मृत्यु प्रकरणाचा अंमली पदार्थांचा संबंध उघडकीस आल्यामुळे एका वेगळ्या दृष्टीकोनातून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सुशांत सिंग राजपूत तसेच या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती व तिचे संबंधित सर्वांचे फोन डिटेल्स तपास पथकाने मिळविल्यांतर आर्या याचे नावही आता चर्चेत आले आहे. या प्रकरणामुळे आर्या अडणीत आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या पथकाने गोव्यात दाखल होवून चौकशी सुरूही केली आहे.
हणजुणे य़ेथील हॉटेल आर्या रिसॉर्ट बरोबरच रिसॉर्ट कोटिंगा या त्याच्या दुसऱ्या रिसॉर्टचीही एनसीबी झडती घेण्याची शक्यता आहे.