Sushant Singh Rajput Suicide : महेश भट्ट यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 03:05 PM2020-07-27T15:05:53+5:302020-07-27T15:08:39+5:30

Sushant Singh Rajput Suicide : येथे या प्रकरणातील तपास अधिकारी व इतर पथक त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता महेश भट्ट हे पोलीस ठाण्यातून आपल्या घराकडे परतले आहेत.

Sushant Singh Rajput Suicide: Mahesh Bhatt recorded statement at Santa Cruz Police Station | Sushant Singh Rajput Suicide : महेश भट्ट यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब

Sushant Singh Rajput Suicide : महेश भट्ट यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब

Next
ठळक मुद्दे महेश भट्ट यांना मुंबई पोलिसांनी आज दुपारी 12 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर महेश भट्ट आणि करण जोहर यांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे, गृहमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे तपासाला गती येणार असल्याचे दिसते. यापूर्वीही मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्ती, आदित्य चोपडा, संजय लीला भ

मुंबईपोलिसांकडून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अनेक दिग्गज लोकांची विचारपूस केली जात आहे. यासाठी दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट्ट यांना आता वांद्रे पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. महेश भट्ट यांना मुंबईपोलिसांनी आज दुपारी 12 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितले होते. मात्र, त्यांचा जबाब सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये सुमारे दोन तास नोंदविण्यात आला. येथे या प्रकरणातील तपास अधिकारी व इतर पथक त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता महेश भट्ट हे पोलीस ठाण्यातून आपल्या घराकडे परतले आहेत.

महेश भट्ट यांना पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि २ अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले. रविवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात महेश भट्ट आणि करण जोहरच्या मॅनेजरची चौकशी केली जाईल. नंतर असे म्हटले होते की करणचे मॅनेजर नसून धर्म प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांना देखील जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले आहे. आता महेश भट्ट यांनी आपला जबाब नोंदवला असून या प्रकरणात कोणता मोठा खुलासा होणार आहे याकडे बॉलिवूड सृष्टीचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोठे विधान

एएनआयशी बोलताना अनिल देशमुख यांनी सुशांत प्रकरणात चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांची चौकशी करण्यास सांगितले होते. या प्रकरणात महेश भट्ट यांचा जबाबत नोंदविण्यात येईल, असे ते म्हणाले होते. तसेच अनिल देशमुख यांनी असेही म्हटले आहे की, या प्रकरणात करण जोहरच्या मॅनेजरला चौकशीदरम्यान प्रश्न विचारले जातील . सुशांतच्या आत्महत्येला आता 1 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, दरम्यानच्या काळात पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. याप्रकरणी दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंद करण्यात येईल. तर, करण जोहरच्या मॅनेजरचीही चौकशी करण्यात येईल. गरज पडल्यास करण जोहरला पोलिसांकडून बोलविण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.

सुशांतच्या मृत्यूनंतर महेश भट्ट आणि करण जोहर यांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे, गृहमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे तपासाला गती येणार असल्याचे दिसते. यापूर्वीही मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्ती, आदित्य चोपडा, संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली आहे.

 

 

''

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

Read in English

Web Title: Sushant Singh Rajput Suicide: Mahesh Bhatt recorded statement at Santa Cruz Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.