दोन बुद्धिबळपटूंचा मृत्यू, गॅसने भरलेले फुगे सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:36 PM2020-03-06T22:36:11+5:302020-03-06T22:39:04+5:30
फुगे फुगविण्यासाठी त्या गॅसचा वापर करण्यात आला होता.
मॉस्को - २७ वर्षीय युक्रेनियन बुद्धीबळपटू आणि त्याची १८ वर्षीय गर्लफ्रेंडचा लाफिंग गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह मॉस्कोमध्ये फ्लॅटमध्ये सापडले आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. मीडिया वृत्तानुसार स्टॅनिस्लाव बोगदानोविच आणि अलेक्झांड्रा वेर्निगोरा हे दोघेही प्रसिद्ध बुद्धीबळपटू आहेत. ते गॅस, नायट्रस ऑक्साईडने भरलेल्या फुग्ग्यांसह आढळून आले. फुगे फुगविण्यासाठी त्या गॅसचा वापर करण्यात आला होता.
रशियन तपास करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयित आढळून आलेले नाही. बोगदानोविच वेगवान बुद्धीबळ खेळाडू होता. व्हर्निगोरा हे देखील एक व्यावसायिक बुद्धिबळपटू होते आणि ते मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. युक्रेनियन स्पोर्ट्स वेबसाइट sports.ua ने दिलेल्या माहितीनुसार की, बोगदानोविच ओडेसाचा एक ग्रँडमास्टर होता, ज्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये युक्रेनियन अंडर - १८ चॅम्पियनशिप आणि विविध बुद्धिबळ पुरस्कार जिंकले आहे. रशियन बुद्धीबळ वेबसाइट chess-news.ur ने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये त्याला वेगवान बुद्धीबळपटू म्हणून जगातील आठवे स्थान देण्यात आले होते.