अपघातात जखमी झाल्याचा फायदा घेऊन चोरट्याने लंपास केली १ लाख ९७ हजार असलेली बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 11:39 AM2020-11-17T11:39:17+5:302020-11-17T11:42:18+5:30
Pune Crime News : अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर - अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने जखमी जवळ असलेली १ लाख ९७ हजार रूपये ठेवलेली बॅग चोरून नेली आहे. याप्रकरणी सुशील चंद्रकांत देसाई ( वय २९, रा. अविनाश कपूर यांचेकडे भाड्याने, शेवाळेवाडी, संपन्न होम मांजरी. ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार देसाई हे कदमवाकवस्ती ( ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील वेन्टाईल कंपनीमध्ये कस्टमर केअर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीत दिवसभराची जमा झालेली रोख रक्कम ते स्वतः बिबवेवाडी येथील मुख्य कार्यालयात जमा करतात.
शुक्रवार (१३ नोव्हेंबर ) रोजी ९ वाजण्याच्या सुमारांस होंडा शाईन दुचाकी क्रमांक एमएच १२ एलई ३५२९ वरून एकटेच बिबवेवाडी येथील मुख्य कार्यालयात दिवसभर जमा झालेली रोख रक्कम १ लाख ९७ हजार ही एका काळे रंगाचे बॅगमधून घेवून जात होते. रात्री ९ - १५ वाजण्यांच्या सुमारास ते कदमवाकवस्ती ग्रामपंचायत समोरील चंद्राई हार्डवेअर समोर आले असता सोलापुर - पुणे महामार्गावरून त्यांचे पुढे चाललेला टॅकर ( क्रमांक माहीत नाही ) अचानक थांबलेने दुचाकी मागून धडकल्याने अपघात झाला.
यामुळे देसाई यांचा डावा गाल व गळयावर मार लागला तसेच उजवे हाताला मार लागून फॅक्चर झालेने त्यांना चक्कर येत होती. त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी नजीकच्या खाजगी रूग्णालयात पाठवले. औषधोपचार सुरू झालेवर कंपनीचे सुरक्षारक्षक जनार्दन नवले व कॅशियर निखिल गवळी हे तेथे पोहोचले त्यावेळी देसाई यांनी त्यांना अपघाताचे वेळी जवळ असलेली काळे रंगाची रोख रक्कम ठेवलेली बॅग अपघाताचे ठिकाणी आहे काय बघून या असे सांगितले. दोघे त्या ठिकाणी गेले. तेथील लोकांकडे विचारपूस करून परीसरात शोध घेतला परंतू बॅग मिळाली नाही. म्हणून त्यांनी अपघाताचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात चोटयाने त्यांचे ताब्यातील काळे रंगाचे बॅगमधील १ लाख ९७ हजार रूपये रोख चोरून नेला आहे, म्हणून माझी अज्ञात टॅकर वरील चालक व अज्ञात चोरटया विरूध्द तक्रार दिली आहे.