टेलर व्यावसायिक बाप - लेकाचा अपघातात दुर्दैवी अंत  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 07:21 PM2018-08-16T19:21:14+5:302018-08-16T19:21:42+5:30

सायन पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करून कारचालक राजेंद्र श्रीचंद्र जैन (वय - ५४) यांना अटक करण्यात आली आहे. 

Taylor's professional father - brother crash accidentally ends | टेलर व्यावसायिक बाप - लेकाचा अपघातात दुर्दैवी अंत  

टेलर व्यावसायिक बाप - लेकाचा अपघातात दुर्दैवी अंत  

Next

मुंबई - काल बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास व्यवसायाने टेलर असलेले व्यंकटेश बालय्या येरला (वय - ७५) आणि त्यांचा मुलगा सचिन येरला (वय - ३६) हे दोघे मोटारसायकलवरून (एमएच ०१, बीव्ही ८२५९) टिळक नगर येथील घरी जात असताना समोरून एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच ०१, सीएच ६९०५) त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवर असलेल्या बाप लेकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अपघातीमृत्यूची नोंद करून कारचालक राजेंद्र श्रीचंद्र जैन (वय - ५४) यांना अटक करण्यात आली आहे. 

टिळक नगर येथील अश्विनी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या येरला कुटुंबियांवर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे. कारण या घरातील करती धरती मंडळीच एकाक्षणात अपघातात निधन पावली आहेत. काल १५ ऑगस्टच्या दिवशी व्यंकटेश आणि सचिन हे बाप लेक टेलरिंगच काम आटपून घरी परतत होते. त्यावेळी टिळक नगर परिसरातील रस्तावर ठाण्याकडून येणाऱ्या एका कारने ओव्हरटेक केल्याने हा अपघात घडला. मोटारसायकलला भरधाव वेगाने आलेल्या कारने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात व्यंकटेश आणि सचिन हे दोघे गंभीर जखमी झाले होते. या अपघातात उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०४(अ), २७९ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये आरोपी कारचालक जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांनी माहिती दिली. 

Web Title: Taylor's professional father - brother crash accidentally ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.