लग्नात जाण्यावरून शिक्षक दाम्पत्यात झाला वाद; पतीने पत्नी अन् मुलाची केली हत्या, नंतर केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 03:22 PM2021-04-30T15:22:24+5:302021-04-30T15:24:12+5:30
मृत व्यक्ती गिर्राज मीणा येथे भाड्याच्या घरात परिवारासोबत राहत होता. तो बूंदी येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होता.
कोरोना महामारीमुळे एकीकडे लोकांचा श्वास गुदमरला जातोय तर दुसरीकडे अशा संकटाच्या काळातही लोक मानसिक रूपाने त्रासले आहेत. त्यामुळे ते अनेकदा घातक पाउल उचलतात. राजस्थानच्या जयपूरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका शिक्षक दाम्पत्यात काही कारणाने वाद झाला. ज्यात पतीला इतका राग आला की, त्याने पत्नी आणि १३ महिन्यांच्या मुलाची गळा चिरून हत्या केली. इतकंच नाही तर नंतर आरोपीने फाशी घेऊन स्वत:ला संपवलं.
दोघेही केंद्रीय विद्यालयात होते शिक्षक
ही खळबळजनक घटना जयपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशनमधील आहे. इथे हे शिक्षक कपल राहत होतं. असे सांगितलं जात आहे की, मृत व्यक्ती गिर्राज मीणा येथे भाड्याच्या घरात परिवारासोबत राहत होता. तो बूंदी येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी समिता मीणा ही सुद्धा शिक्षिका होती. ती जयपूरच्या केंद्रीय विद्यालयात शिकवत होती. त्यांना १३ महिन्यांना मुलगा होता. (हे पण वाचा : अरे देवा! गर्लफ्रेन्डसोबत लग्न करण्यासाठी मुलाकडून स्वत:च्या बापाची हत्या, १० लाखांची दिली होती सुपारी...)
लग्नात जाण्यावरून झाला वाद आणि....
असे सांगितले जात आहे की, पत्नी समिता मीणाच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. ज्यासाठी त्यांना परिवारातील लोक येण्यासाठी तगादा लावत होते. मात्र, पती गिर्राज मीणा याचं लग्नात जायचं मन नव्हतं. अशात त्याने पत्नीलाही लग्नात जाण्यास मनाई केली. यावरूनच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. यादरम्यान गुरूवारी सायंकाळी पती-पत्नीत या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर गिर्राजने हे धक्कादायक पाउल उचललं. (हे पण वाचा : ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करत होती नवरी, मोबाइलवर नवरदेवाचा मेसेज आला अन् ऐनवेळी मोडलं लग्न...)
पत्नी आणि मुलाची हत्या केल्यावर पती गिर्राजने फाशी घेऊन आत्महत्या केली. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा समिताच्या वडिलांनी घरी फोन केल्यावर काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यानंतर पोलिसात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचली. त्यांना घरात जे दिसलं ते पाहून त्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. यात फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जात आहे.