उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या नराधमांनी तिची जीभ कापली, गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचे मृत्यूशी झुंज संपली. गेल्या दोन आठवड्यांपासून जीवन व मृत्यूशी लढाई लढत असलेल्या हाथरस येथील चंदपा भागातील तरुणीने आज दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडित मुलगी १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्काराला बळी पडली होती आणि तिची प्रकृती सोमवारी बिघडल्यानंतर तिला अलीगडच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.नराधम आरोपींनी निर्दोष पीडित मुलीवर बलात्कारच केला नाही तर तिची मान मोडली, पाठीचे हाड मोडले आणि तिची जीभ कापली. इतक्या गंभीर स्थितीनंतर पीडितेने पोलिसांना आपला जबाब नोंदवणं सोपे नव्हते. पण धाडसी मुलगी धैर्य गमावले नाही आणि आरोपींविषयी पोलिसांना सर्व काही सांगितले. जिभेचा तुकडा पडल्यानंतरही तिने पोलिसांना आपला जबाब कसा दिला असेल हे जाणून घेऊया, १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर, १९ सप्टेंबरला जेव्हा पीडितेचे म्हणणे नोंदवण्यासाठी पोलीस आले, तेव्हा ती घाबरुन बेशुद्ध झाली होती आणि तिला आपल्यासोबत घडलेल्या दुष्कर्माची माहिती सांगता आली नाही. 22 सप्टेंबरला पुन्हा पोलीस जेएन मेडिकल कॉलेजमध्ये हॅले आणि जबाब नोंदविली. त्यावेळी तिने केवळ इशारा करुन घडलेल्या दुष्कर्माची माहिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा कलम वाढवून चार आरोपींना अटक केली आणि तुरूंगात पाठविले. जबाब घेणाऱ्याने / सीओने त्यांच्या उच्च अधिकऱ्यांना पाठवलेल्या दोन पानांच्या अहवालात ही माहिती उघड केली आहे.चंदपा परिसरातील घडलेल्या या घटनेचा सीओ सादाबाद स्तरावर तपास सुरू आहे. या घटनेनंतर तपासात काय केले गेले आहे, यासह त्याने संपूर्ण प्रकरणांचा अहवाल आपल्या उच्च अधिकाऱ्यांना पाठविला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मुलीला जेएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची जीभ कापली गेली होती आणि मान देखील तुटली होती. १९ सप्टेंबरला जेव्हा कार्यवाहक सीओ सादाबाद महिला कॉन्स्टेबलसमवेत तिचा जबाब नोंदवण्यासाठी आली, तेव्हा पीडितेची प्रकृती फारशी चांगली नव्हती. तिची प्रकृती पाहून जबाब नोंदविणारी टीमही भावनिक झाली. स्वतःवर होणारे हल्ले आणि क्रौर्य याबद्दल ती मुलगीच सांगू शकत होती. हल्ल्याबरोबरच 20 सप्टेंबरला छेडछाड करण्याचे कलम वाढविण्यात आले.त्यानंतर सीओ सादाबाद या प्रकरणात २१ सप्टेंबर रोजी जेव्हा जबाब नोंदविण्यासाठी आले तेव्हा कुटुंबीयांनीही मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. यावर, सीओ २२ सप्टेंबर रोजी पुन्हा महिला कॉन्स्टेबलसह परत आले, जेव्हा मुलीने हावभाव करत घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, गुन्ह्यात काही कलम वाढवून, चारही आरोपींना तुरूंगात पाठविण्यात आले.सोशल मीडियावर पोलिस पलटवार करीत आहेतहाथरस घटनेबाबत बसपा अध्यक्षा मायावती यांनी केलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर विविध टिप्पण्या केल्या जात आहेत. तेव्हापासून पोलिसांनीही पलटवार केला आहे. हाथरस जिल्हा पोलिस ते आयजी श्रेणीपर्यंत त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या मदतीने या प्रकरणातील चार आरोपींना तुरूंगात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती देत आहेत. मुलीच्या जबाबाच्याआधारे बलात्काराचा कलम वाढविण्यात आला आहे. कुटुंबातील सुरक्षेसाठी पोलिस सर्व मदतीची काळजी घेत आहेत. पुढे आरोपींविरोधात कडक कारवाईची तयारी सुरू आहे.
गंभीर जखमी पीडित तरुणीला आधी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 15 दिवसांपूर्वी हाथरसमध्ये सामूहिक बलात्काराची ही घटना घडली होती. मंगळवारी सकाळी सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आरोपींनी महिलेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पीडितेने स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपींनी तरुणीची जीभ कापली होती. गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या तरुणीवर उपचार सुरू होते, मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.