धक्कादायक! लोकांचे बेडरूममधील खाजगी क्षण बघण्यासाठी 'त्याने' २०० घरातील CCTV केले हॅक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 04:45 PM2021-01-23T16:45:01+5:302021-01-23T16:46:23+5:30
असे सांगितले जाते की, ३५ वर्षीय या टेक्निशिअनने साधारण ९६०० वेळा ग्राहकांचं अकाउंट अॅक्सेस केलं. चला जाणून घेऊ काय आहे पूर्ण प्रकरण.....
सिक्युरिटी सिस्टीम पुरवणाऱ्या एका कंपनीच्या टेक्निशिअनने साधारण २०० घरातील सीसीटीव्ही फुटेज हॅक केले. असं तो करून तो कपल्स आणि सुंदर महिलांच्या खाजगी क्षणांवर लक्ष ठेवू लागला होता. असे सांगितले जाते की, ३५ वर्षीय या टेक्निशिअनने साधारण ९६०० वेळा ग्राहकांचं अकाउंट अॅक्सेस केलं. चला जाणून घेऊ काय आहे पूर्ण प्रकरण.....
लोकांच्या घरातील सीसीटीव्ह हॅक करण्याची ही घटना अमेरिकेतील टेक्सासमध्ये घडली आहे. टेलिस्फोरो एविल्स नावाचा टेक्निशिअन ADT कंपनीमध्ये कामाला होता. ही कंपनी घरी आणि ऑफिसमध्ये सिक्युरिटी अलार्म सर्व्हिस पुरवते. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये एविल्सला नोकरीहून काढण्यात आलं होतं.
अमेरिकेतील एका कोर्टात सुनावणी दरम्यान गुरूवारी एविल्सने हे मान्य केलं की, तो 'सुंदर' ग्राहकांची जासूसी करत होता. इतकंच नाही तर तो हा कारनामा गेल्या साडे चार वर्षांपासून करत होता. दोषी ठरवल्यावर एविल्सला आथा ५ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
एविल्स ग्राहकांच्या प्रोफाइलमध्ये आपला ई-मेल आयडी जोडत होता. ज्याव्दारे तो त्यांच्या सीसीटीव्हचा अॅक्सेस मिळवत होता. तो ग्राहकांचे खाजगी क्षण लाइव्ह बघत होता. एविल्स ग्राहकांना सांगत होता की, सिस्टीम टेस्ट करण्यासाठी त्याला काही वेळासाठी त्याचा ई-मेल आयडी जोडण्याची गरज आहे. अनेक ग्राहकांना तर तो न सांगताही आपला ई-मेल आयडी जोडत होता.
टेक्सासच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, एविल्स आधी एक लिस्ट तयार करत होता की, कोणत्या घरांमध्ये सुंदर महिला राहतात. आणि त्यानुसार त्यांचे खाजगी क्षण लाइव्ह बघत होता. गेल्यावर्षी अनेक ग्राहकांनी कंपनीवर केस करण्याचाही विचार केला होता.