फेक फॅन्स फॉलोअर्स बनविण्यात दहा बड्या सेलिब्रिटींचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:35 AM2020-07-18T02:35:43+5:302020-07-18T07:22:32+5:30
इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दहा सेलिब्रिटींचे कोट्यवधी फॅन्स आहेत. गायिका भूमी त्रिवेदी हिने याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे ११ जुलै रोजी तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : सोशल मीडियावरील आंतरराष्ट्रीय फेक प्रोफाईल रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटने (सीआययू) पदार्फाश करत एकाला कुर्ला येथून अटक केली. त्याच्या चौकशीत खऱ्या सोशल मीडिया अकाउंटमध्येही कोट्यवधी फेक फॅन्स असल्याचे समोर आले आहे. ज्यात दहा सेलिब्रिटी असून त्यात दोन बड्या अभिनेत्री आहेत.
इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दहा सेलिब्रिटींचे कोट्यवधी फॅन्स आहेत. गायिका भूमी त्रिवेदी हिने याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे ११ जुलै रोजी तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली. चौकशीत सेलिब्रिटींचे फेक आयडी बनवून फॉलोअर्स वाढविण्यात आल्याचे समोर आले. शिवाय त्याच सेलिब्रिटींच्या खºया सोशल मीडिया अकाउंटमध्येही कोट्यवधी फेक फॉलोअर्स असल्याची माहिती मिळाली.
कोट्यवधी फॅन्स असल्याचे दाखवून हे सेलिब्रिटी मोठमोठ्या कंपन्यांकडून जाहिरात मिळवून कोट्यवधी रुपये कमावतात. फॅन फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी फेक प्रोफाइल बनवणाºया टोळक्याला लाखो रुपये देतात. त्यामुळे या गुन्ह्यात ते देखील सहआरोपी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लाईक्स आणि कमेंटचे दरपत्रक
याप्रकरणी एका पोर्टलसाठी काम करणाºयाला पोलिसांनी कुर्ला येथून अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून बनावट प्रोफाइल बनवून त्यावर लाईक्स आणि कमेंटसाठी आकारल्या जाणाºया वेगवेगळ्या दराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तसेच तपासाअंती समोर आलेल्या दहा सेलिब्रिटींना लवकरच समन्स बजावण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.