जम्मू - काश्मीर - २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना आज सायंकाळी जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईत या दहशतवाद्यांना श्रीनगरच्या हजरतबल परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या अतिरेक्यांची नावे एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद, साहिल फारुख आणि नसीर अहमद मीर अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे मोठे मोड्यूल गुरुवारी सायंकाळी हजरतबलजवळ या दहशतवाद्यांना अटक करून उध्वस्त केले आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अटक दहशतवादी २६ जानेवारीच्या सुमारास श्रीनगरमध्ये आयईडी हल्ल्याचा कट रचत होते. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले
डीएसपीसह १३ जानेवारीला दहशतवाद्यांना केली होती अटक अलीकडेच काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील दोन दहशतवाद्यांना जवानांनी अटक केली होती. दहशतवाद्यांसह कुलगाममधील जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी देविंदर सिंग यांनाही अधिकाऱ्यांनी अटक केली. दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून देविंदर सिंगला अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.