अमेरिकेच्या टेक्सासमध्ये १६ वर्षीय मुलाच्या प्रेमात वेडी झालेल्या शिक्षिकेने हैराण करणारं कृत्य केलं आहे. जेव्हा हा मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत क्लासमध्ये बसला होता तेव्हा शिक्षिकेने त्याला पाहिलं आणि तिला हे सहन झालं नाही. त्यानंतर या शिक्षिकेने जे केले ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या ही शिक्षिका पोलिसांच्या ताब्यात असून तिला कोर्टात हजर करण्यातही आले आहे.
या शिक्षिकेने मुलाच्या डोक्यात कैची फेकून मारली. इतक्यावर न थांबता तिने विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध बनवले. ज्यावेळी याचा खुलासा झाला तेव्हा आरोपी महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली. टेक्सासच्या सीई किंग हायस्कूलमधील शिक्षिका कॅटरिना मैक्सवेलवर तिच्या क्लासमधील १६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. डेली स्टार वेबसाईटनुसार, विद्यार्थ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहून शिक्षिकेला राग अनावर झाला. तिने तिच्याजवळील कैची विद्यार्थ्याच्या अंगावर फेकली. ती त्याच्या डोक्याला लागली.
कॅटरिना मैक्सवेल हिच्यावर त्या १६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. कोर्टाच्या रेकॉर्डनुसार, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन प्रशासनाला एका कर्मचाऱ्याकडून याची माहिती मिळाली. या कर्मचाऱ्याला शिक्षिका मैक्सवेलचं विद्यार्थ्यासोबतची वागणूक पाहून संशय आला जेव्हा विद्यार्थी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बाहेर फिरत होता तेव्हा त्याला बघून शिक्षिका विचित्र वागत असल्याचं त्याने नोटीस केले. याच कर्मचाऱ्याने दुसऱ्या प्रकाराची माहिती दिली.
ज्याने सांगितले की, जेव्हा विद्यार्थी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत क्लासमध्ये बसला होता तेव्हा क्लास टीचरनं कैची फेकली ती त्याच्या डोक्याला लागली. पोलिसांनी या प्रकरणात शिक्षिका मैक्सवेलला अटक केली तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने विद्यार्थ्यासोबत तिच्या कारच्या मागच्या सीटवर बसून दोनदा संबंध ठेवले होते. पोलिसांच्या चौकशीत पीडित विद्यार्थी म्हणाला की, मार्च आणि एप्रिलमध्ये अनेकदा शिक्षिकेने त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले आहेत. हे प्रकरण समोर येताच शाळा प्रशासनाने मैक्सवेलला शाळेतून काढून टाकलं आहे.
स्कूल डिस्ट्रिक्टकडून सांगण्यात आलं आहे की, त्यांना टीचर कॅटरिना मैक्सवेल आणि शाळेतील विद्यार्थी यांच्यातील संबंधांबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तात्काळ या शिक्षिकेला शाळेतून काढण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. ज्यात आरोपी शिक्षिका दोषी असल्याचं सिद्ध झालं. जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, आमचं पहिलं प्राधान्य विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक सुरक्षित स्थान प्रदान करणं आवश्यक आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलं की, ही घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षिकेवर खटला दाखल करावा. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली.